The Hundred मध्ये ‘या’ भारतीय महिला खेळाडूचा कहर सुरुच, 10 चेंडूत ठोकल्या 40 धावा, चौकारांचा पाऊस

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या The Hundred या स्पर्धेत पहिल्या सामन्यात नाबाद 92 धावा झळकावल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात ही अप्रतिम कामगिरी केली आहे.

The Hundred मध्ये 'या' भारतीय महिला खेळाडूचा कहर सुरुच, 10 चेंडूत ठोकल्या 40 धावा, चौकारांचा पाऊस
जेमिमा रॉड्रिग्स
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 10:55 AM

लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच इंग्लंडचा दौरा केला. सर्व सामन्यात कडवी झुंज देत भारतीय महिलांनी त्यांच्या खेळाचा दर्जा क्रिकेट जगताना दाखवला. त्यानंतर आता भारताची युवा फलंदाज जेमिमा रोड्रिग्स (Jemimah Rodrigues) इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या द हंड्रेड स्पर्धेत (The Hundred Tournament) धमाल कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात तिने नाबाद 92 धावा ठोकल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळताना तिने ट्रेंट रॉकेट्ससंघाविरुद्ध 41 चेडूंत 60 धावा केल्या यावेळी पहिल्या 40 धावा तर तिने अवघ्या 10 चेंडूत केल्या होत्या. तिच्या या खेळीमुळे नॉर्दर्न सुपरचार्जर्सने ट्रेंट रॉकेट्सवर 27  धावांनी विजयही मिळवला.

जेमिमाचा संघ नॉर्दर्न सुपरचार्जर्सने प्रथम फलंदाजी केली. यावेळी जेमिमाने जोडीदार विनफील्ड हिल (33) च्या सोबत 54 चेंडूत 64 धावांची भागिदारी केली. ज्याच्या जोरावर सुपरचार्जर्सने 100 चेंडूत 149 वर 7 बाद स्कोर बनवला.  त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ट्रेंट रॉकेट्स संघ 122 धावाच करु शकल्याने नॉर्दर्न सुपरचार्जर्स विजयी झाले.

दुसऱ्यांदा केली कमाल

जेमिमाने सीजनच्या सुरुवातीला देखील नाबाद 92 धावांची खेळी केली होती. रॉड्रिग्ससाठी ही खेळी खास ठरली कारण ज्यावेळी ती फलंदाजीला आली त्यावेळेस तिच्या सुपरचार्जर्स संघाचा स्कोर 18 चेंडूत चार बाद 19 इतकाच होता. रॉड्रिग्सने एकहाती सर्व सामना सांभाळत 43 चेंडूत 17 चौकारांसह एक षटकार ठोकत नाबाद 92 धावा ठोकल्या आणि  सामना जिंकवून दिला.

जेमिमाचा इंग्लंडमधील रेकॉर्ड लक्षणीय

जेमिमाने 2018 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं होतं. आतापर्यंत 21 एकदिवसीय सामन्यात 19.70 च्या सरासरीने 394 रन्स केले आहेत. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. जेमिमा भारताकडून 47 टी-20 सामने खेळली असून यात तिने 26.37 च्या सरासरीने 976 धावा ठोकल्या आहेत. या सर्वात इंग्लंडमध्ये जेमिमा हीचा टी-20 क्रिकेटमधील रेकॉर्ड अप्रतिम आहे. तिने 11 डावांत 158.52 च्या स्ट्राइक रेटने 70.42 च्या सरासरीने 493 धावा ठोकल्या आहेत. तिने इंग्लंडमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये एका शतकासह तीन अर्धशतकं ठोकली आहेत.

इतर बातम्या

विराट, रोहितनंतर ‘हा’ फलंदाजही तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लीट पॅकेज’, भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

सूर्यकुमारचं अर्धशतक, भुवनेश्वरचे 4 बळी, भारताची श्रीलंकेवर 38 धावांनी मात

IPL 2021: यूएईत 19 सप्टेंबरपासून घमासान, पहिल्या सामन्यात मुंबई VS चेन्नई भिडणार, पाहा संपूर्ण टाईमटेबल एका क्लिकवर

(Indian Women Batter Jemimah Rodrigues stunning innings with 40 runs in 10 balls at the hundred )

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.