AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Umran Malik : उमरान मलिकने रोहित शर्माचा विश्वास का गमावला? पारस म्हाब्रेने सांगितली Inside Story

Umran Malik : उमरान मलिकला लोक विसरले. वेगवान गोलंदाजीमुळे उमरान मलिक नजरेत आला. 2022 चा आयपीएल सीजन त्याने गाजवला. 150 kmph पेक्षा जास्त वेगाने सातत्यपूर्ण गोलंदाजी ही उमरानची खासियत. भारतात इतक्या वेगाने गोलंदाजी करणारे बॉलर दुर्मिळ आहेत.

Umran Malik : उमरान मलिकने रोहित शर्माचा विश्वास का गमावला? पारस म्हाब्रेने सांगितली Inside Story
Umran Malik
| Updated on: Jul 18, 2024 | 1:22 PM
Share

क्रिकेटच्या क्षितिजावर काही नाव अचानक उदयाला येतात. अस्ताला सुद्धा तशीच जातात. उमरान मलिक सुद्धा असाच क्रिकेटपटू. जम्मू-काश्मीरमधून येणाऱ्या या क्रिकेटपटूने अल्पावधीत ओळख बनवली, नाव कमावलं. पण आज हा क्रिकेटपटू गायब आहे. उमरान मलिकला लोक विसरले. वेगवान गोलंदाजीमुळे उमरान मलिक नजरेत आला. 2022 चा आयपीएल सीजन त्याने गाजवला. 150 kmph पेक्षा जास्त वेगाने सातत्यपूर्ण गोलंदाजी ही उमरानची खासियत. भारतात इतक्या वेगाने गोलंदाजी करणारे बॉलर दुर्मिळ आहेत. त्यामुळे क्रिकेट फॅन्स आणि एक्सपर्ट्सच्या अपेक्षा उमरान मलिकने वाढवल्या. IPL 2022 मधील दमदार प्रदर्शनामुळे त्याच्यासाठी T20 आणि वनडे संघाचे दरवाजे उघडले. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तो आयपीएलच्या प्रदर्शनाची पुनरावृत्ती करु शकला नाही.

उमरान मलिककडे पेस होता. पण त्याच्या गोलंदाजीत दिशा आणि टप्पा नव्हता. त्यामुळे आज अशी वेळ आलीय की, उमरान मलिक टीम इंडियातून बाहेर गेलाच. पण आयपीएल फ्रेंचायजीकडूनही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नाहीय. उमरान मलिककडे अपेक्षेन भरलेलं भविष्य होतं. पण आज हे नाव लोक विसरुन गेलेत. उमरान मलिक टीम इंडियात आला तेव्हा आणि तो बाहेर गेला त्यावेळी पारस म्हाब्रे टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी उमरान मलिकला जवळून पाहिलय. उमरान मलिकच्या बाबतीत असं का झालं? त्या बद्दल त्यांनी माहिती दिलीय.

म्हाब्रे मलिक बाबत काय म्हणाले?

“प्रतिभा कमवावी लागते. गोलंदाजीत वेग ही दुर्मीळ बाब आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती क्षमता दिसते. तो 145-148 kmph वेगाने गोलंदाजी करत होता. 160kpmh च्या गतीने स्पीड-गनसारखी बॉलिंग करणाऱ्याला पाहून मी हुरळून जात नाही. कारण मला ते खरं वाटत नाही. गती ही त्याच्या गोलंदाजीची ताकद आहे. तो अर्थातच वेगवान गोलंदाजी करायचा. 140 kmph वेगाच्या सातत्याने तो गोलंदाजी करायचा” असं म्हाब्रे उमरान मलिक बाबत म्हणाले.

‘तर तुम्ही कॅप्टनचा विश्वास गमावता’

“या वेगाने सातत्यपूर्ण गोलंदाजी करणं चांगली बाब आहे. त्याने ते केलं. T20 मध्ये तुमच्याकडे नियंत्रण नसेल, तर तुम्हाला संघर्ष करावा लागतो. गोलंदाजी करताना तुमच्याकडे नियंत्रण नसेल, तर तुम्ही कॅप्टनचा विश्वास गमावता. तुम्हाला गोलंदाजी करताना नियंत्रण हव असेल, तर ते तुम्हाला रणजी खेळूनच शक्य होऊ शकतं. म्हणून त्याने रणजी क्रिकेट खेळावं यासाठी आमचा आग्रह होता. त्यानंतर तो दबावाखाली सुद्धा उत्तम गोलंदाजी करु शकतो” असं पारस म्हाब्रे म्हणाले. मागच्यावर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सीरीजमध्ये उमरान मलिक शेवटचा टीममध्ये दिसला होता.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.