AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDW vs SAW : दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान, भारताचा विजय निश्चित! पाहा आकडे

South Africa vs India Women 1st Inning Highlights : भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मात्र टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकून विजयी हॅट्रिक करणार असं आकडे सांगतात. जाणून घ्या

INDW vs SAW : दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान, भारताचा विजय निश्चित! पाहा आकडे
Harmanpreet Kaur and Shafali Verma Team IndiaImage Credit source: bcci women X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 21, 2026 | 9:33 PM
Share

टीम इंडियाने आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतीय महिला संघाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 158 रन्स केल्या. मँचेस्टरमध्ये आयोजित या सामन्यात भारतासाठी पहिल्या 7 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकाही फलंदाजाला भारतासाठी मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे भारताला 8 च्या रनरेटनेही धावा करता आल्या नाहीत. मात्र त्यानंतरही टीम इंडिया हा सामना जिंकणार, असं आम्ही नाही तर टीम इंडियाची आकडेवारी सांगते. नक्की ही आकडेवारी काय आहे? हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाची बॅटिंग

टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारतासाठी सलामीवीर शफाली वर्मा हीने सर्वाधिक 31 धावा केल्या. दीप्ती शर्मा हीने 29 धावांची निर्णायक खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने 24 धावांचं योगदान दिलं. शफाली, दीप्ती आणि हरमनप्रीत या तिघींव्यतिरिक्त एकीलाही 20 पार पोहचता आलं नाही. स्मृती मंधाना हीने 17 रन्स केल्या. ऋचा घोष आणि यास्तिका भाटीया या दोघींनी प्रत्येकी 15-15 धावांचं योगदान दिलं. तर जेमीमाह रॉड्रिग्स हीने 12 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर अरुंधती रेड्डी आणि डेब्युटंट प्रेमा रावत या दोघींनी शेवटच्या क्षणी महत्वपूर्ण धावा जोडल्या. अरुंधतीने नाबाद 6 तर प्रेमाने नॉट आऊट 3 रन्स केल्या.

दक्षिण आफ्रिकेसाठी शबनिम इस्माईल आणि मारीजान काप या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मलाबा, अयाबोंगा खाका आणि नादीन डी क्लर्क या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडिया जिंकणार!

टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 130 धावा केल्या आहेत तेव्हा तेव्हा विजय मिळवला आहे. भारताने एकूण 13 वेळा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 130 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. भारताने या 13 वेळा विजय मिळवला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोच्च 135 धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम आहे. दक्षिण आफ्रिकेने 2024 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही कामगिरी केली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला टीम इंडिया विरुद्ध जिंकायचं असेल तर 24 धावा जास्त कराव्या लागतील. त्यामुळे दक्षिण आफ्रिका टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत आपला सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम मोडीत काढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी