
वूमन्स टीम इंडिया शुक्रवारी हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. वूमन्स टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका वूमन्स यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 2 सामन्यांनंतर आघाडीवर आहे. टीम इंडियाने या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आणि भक्कम आघाडी मिळवली आहे. त्यामुळे महिला ब्रिगेडकडे हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर श्रीलंकेसाठी मालिका बचावण्यासाठी ही शेवटची संधी आहे. अशात श्रीलंका या सामन्यात पूर्ण ताकदीने उतरणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका तिसरा टी 20I सामना शुक्रवारी 26 डिसेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका तिसरा टी 20I सामना तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका तिसरा टी 20I सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका तिसरा टी 20I सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
तिसऱ्या टी 20I सामन्यातून प्लेइंग ईलेव्हनमध्ये आयसीसी रँकिंगमधील नंबर 1 ऑलराउंडर दीप्ती शर्मा हीचं कमबॅक होण्याची अधिक शक्यता आहे. दीप्तीला दुसऱ्या सामन्याला तब्येत बरी नसल्याने मुकावं लागलं होतं. दीप्तीच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्नेह राणा हीचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आता दीप्तीचं कमबॅक झाल्यास स्नेहला बाहेर बसावं लागू शकतं.
दरम्यान वूमन्स टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 28 पैकी 22 टी 20I सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेला फक्त 5 सामनेच जिंकता आलेत. आता तिसऱ्या सामन्यात काय होतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.