AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 | अखेर ठरले, आयपीएल भारतात की दुबईत निर्णय झाला, कधीपासून सुरु होणार सामने

IPL 2024 Schedule | ‘आयपीएल’चा मागील वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता. त्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर सर्वाधिक म्हणजे २४.७५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाने मिचेलला खरेदी केले होते.

IPL 2024  | अखेर ठरले, आयपीएल भारतात की दुबईत निर्णय झाला, कधीपासून सुरु होणार सामने
| Updated on: Feb 22, 2024 | 5:56 PM
Share

मुंबई, दि. 21 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीमुळे इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) स्पर्धा कुठे होणार ? यासंदर्भात संदिग्धता होती. भारत किंवा दुबईत स्पर्धा घेण्याचा पर्याय समोर ठेवला होता. परंतु या स्पर्धा कुठे होणार यासंदर्भातील माहिती ‘आयपीएल’चे अध्यक्ष अरुण धुमल यांनी देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘आयपीएल’च्या १७व्या सत्राचा कार्यक्रम कधी सुरु होणार आहे, त्याची माहिती त्यांनी दिली आहे. या स्पर्धा भारतातच होणार असल्याचे धुमल यांनी सांगितले. आयपीएल स्पर्धा य़ेत्या २२ मार्चपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीमुळे असा बदल

लोकसभा निवडणुकांच्या तारखा मार्च माहिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीचा केवळ १५ दिवसांच्या कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित सामन्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात बोलताना धुमल म्हणाले की, आयपीएलची सुरुवात २२ मार्चपासून करण्याचा आमचा विचार आहे. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या तारखांकडे लक्ष ठेवत आहोत. आयपीएल भारतातच होणार आहे. जूनमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे.  त्यामुळे आयपीएलचा अंतिम सामना २६ मेला होण्याची शक्यता आहे.

२००९ मध्ये असे झाले होते

लोकसभा निवडणुकांमुळे २००९ मध्ये ‘आयपीएल’चे संपूर्ण सत्र दक्षिण आफ्रिकेत घेण्यात आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये काही सामने संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे पार पडले होते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांदरम्यान आयपीएल भारतातच झाल्या. यंदाह या स्पर्धा दुबईत होण्याची चर्चा होती. आयपीएलचा पहिला सामना गतविजेता आणि उपविजेतामध्ये होतो. यामुळे यंदाही पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे.

‘आयपीएल’चा मागील वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता. त्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर सर्वाधिक म्हणजे २४.७५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाने मिचेलला खरेदी केले होते. भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा न्यूयॉर्कमध्ये सुरु होणार आहे. भारत ५ जूनला आयर्लंडविरुद्ध पाहिला सामना खेळणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना १ जूनला कॅनडा व अमेरिकेदरम्यान होणार आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.