IPL 2021 मधला RCB चा प्रवास संपुष्टात, ग्लेन मॅक्सवेलने शेअर केली मन की बात, ‘त्या’ लोकांना इशारा

आरसीबीला प्लेऑफपर्यंत पोहोचवण्यात ग्लेन मॅक्सवेलचं (Glenn Maxwell) मोठं योगदान आहे. त्याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर त्याचा RCB सोबतचा अनुभव शेअर केला आहे. सोबतच काही लोकांना इशारा दिला आहे.

IPL 2021 मधला RCB चा प्रवास संपुष्टात, ग्लेन मॅक्सवेलने शेअर केली मन की बात, 'त्या' लोकांना इशारा
Glenn Maxwell
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 11:49 AM

IPL 2021 : इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वाचा सोमवारी 58 वा आणि अतिशय महत्त्वाचा सामना होता. अंतिम सामन्यात स्थान मिळवलेल्या चेन्नई सुपरकिंग्सला भिडण्यासाठी दिल्ली, केकेआर, आरसीबी या संघामध्ये चुरस होती. दरम्यान दिल्ली गुणतालिकेत वर असल्याने आरसीबी आणि केकेआरमधील विजेता संघ अंतिम सामन्यात एन्ट्रीसाठी दिल्लीशी भिडणार आहे. याच लढतीत आरसीबी केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभूत झाल्यामुळे स्पर्धेहबाहेर गेली आहे. तर केकेआर आता अंतिम सामन्यात जाण्यासाठी दिल्लीसोबत मंगळवारी (12 ऑक्टोबर) भिडणार आहे. (IPL 2021: Glenn Maxwell hits back at ‘horrible people’ for ‘spreading abuse’ following RCB’s defeat)

सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीच्या फलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने ते केवळ 138 धावापर्यंत पोहचू शकले. ज्या धावा केकेआरच्या केकेआरच्या शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, नितीश राणा आणि सुनील नारायण या सर्वांनी मिळून केल्या. ज्यामुळे केकआरचा संघ 4 विकेट्सनी विजयी झाला आहे. पण आरसीबी संघ मात्र पराभूत झाल्याने विराटचं विजयी कर्णधार होण्याचं स्वप्नही भंगलं आहे.

आरसीबीला प्लेऑफपर्यंत पोहोचवण्यात ग्लेन मॅक्सवेलचं (Glenn Maxwell) मोठं योगदान आहे. त्याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर त्याचा RCB सोबतचा अनुभव शेअर केला आहे. सोबतच काही लोकांना इशारा दिला आहे.

ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “हा आरसीबीसाठी चांगला हंगाम होता. आम्ही जसा विचार केला होता त्यापेक्षा थोडी वाईट कामगिरी केली. पण याचा अर्थ असा नाही की, हा हंगाम आमच्यासाठी चांगला गेला नाही. पण तरीही सोशल मीडियावर अशा काही गोष्टी घडत आहेत, ज्या खूप लाजिरवाण्या आहेत. त्यांना हे समजले पाहिजे की आम्हीही माणसं आहोत आणि दररोज आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा विचार करतो. अशा परिस्थितीत काही लोकांना विनंती आहे की, त्यांनी अपमानास्पद भाषा वापरणे थांबवले पाहिजे आणि त्यांनी सुसंस्कृत व्यक्ती बनले पाहिजे.”

सोशल मीडियावर अपशब्द वापरणाऱ्यांना चेतावणी

मॅक्सवेलने पुढे लिहिले, “आरसीबीच्या खऱ्या चाहत्यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल खूप आभार. काही निरुपयोगी लोक आहेत ज्यांनी नुकतेच सोशल मीडियाला भीतीदायक ठिकाण बनवले आहे. हे असह्य आहे. त्यांना विनंती आहे की, त्यांनी असे करु नये. जर तुम्ही माझ्या कोणत्याही टीममेट किंवा मित्राला सोशल मीडियावर शिव्या दिल्या तर तुम्हाला आमच्यापैकी प्रत्येक जण ब्लॉक करेल. उद्धटपणा दाखवून काय उपयोग? असंही अशा लोकांकडे माफीची कोणतीही जागा नाही.”

इतर बातम्या

IPL 2021: परदेशी गोलंदाजानी तारलं त्यांच्या संघाना, सर्वाधिक विकेट्सच्या शर्यतीत ‘हे’ अव्वल गोलंदाज

IPL 2021: विराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!

(IPL 2021: Glenn Maxwell hits back at ‘horrible people’ for ‘spreading abuse’ following RCB’s defeat)

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.