AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: विराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीची कर्णधार म्हणून ही शेवटची आयपीएल असून यंदा ते स्पर्धा जिंकतील अशी आशा होती. मात्र केकेआरने आज त्यांना पराभूत करुन स्पर्धेबाहेर केले आहे.

IPL 2021: विराटचं स्वप्न अधुरचं, केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभव, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात!
आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यातील एक क्षण
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 11:21 PM
Share

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वाचा आज 58 वा आणि अतिशय महत्त्वाचा सामना होता. अंतिम सामन्यात स्थान मिळवलेल्या चेन्नई सुपरकिंग्सला भिडण्यासाठी दिल्ली, केकेआर, आरसीबी या संघामध्ये चुरस होती. दरम्यान दिल्ली गुणतालिकेत वर असल्याने आरसीबी आणि केकेआरमधील विजेता संघ अंतिम सामन्यात एन्ट्रीसाठी दिल्लीशी भिडणार होता. याच लढतीती आरसीबी केकेआरकडून 4 विकेट्सनी पराभूत झाल्यामुळे स्पर्धेहबाहेर गेली आहे. तर केकेआर आता अंतिम सामन्यात जाण्यासाठी दिल्लीसोबत मंगळवारी (12 ऑक्टोबर) भिडणार आहे.

सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीच्या फलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने ते केवळ 138 धावापर्यंत पोहचू शकले. ज्या धावा केकेआरच्या केकेआरच्या गिल, अय्यर, राणा आणि नारायण या सर्वांनी मिळून केल्या. ज्यामुळे केकआरचा संघ 4 विकेट्सनी विजयी झाला आहे. पण आऱसीबी मात्र पराभूत झाल्याने विराटचं विजयी कर्णधार होण्याचं स्वप्नही तुटलं आहे.

सुनील नारायणचा हल्ला

नाणेफेक जिंकत आरसीबीचा कर्णधार विराटने प्रथम फलंदाजी निवडली. पण हा निर्णय संघासाठी खास चांगला ठरला नाही. केकेआरच्या बोलिंग अटॅकसमोर आरसीबी गारद पडली. कर्णधार कोहली (39) सोडता एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने संघ 138 धावांपर्यंतच मजल मारु शकला. यावेळी केकेआरचा दिग्गज फिरकीपटू सुनील नारायणनने (Sunil Narine) याने अप्रतिम गोलंदाजी करत तब्बल 4 महत्त्वाचे विकेट्स घेतले. त्याशिवाय लॉकीनेही 2 विकेट्स टीपले.

केकेआरकडून संयमी फलंदाजी

आजची विकेट गोलंदाजांसांठी उत्तम असल्याने केकेआरला 139 धावांचे सोपे लक्ष्य पार करतानाही खूप मेहनत घ्यावी लागली. आरसीबीकडून उत्तम गोलंदाजीचं दर्शन घडलं. पण केकेआरच्या फलंदाजानी संयमी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. यावेळी सलामीवी शुभमन  (29) आणि व्यंकटेशने (26) थोडी चांगली सुरुवात करु दिली. ज्यानंतर मधल्या फळीत राणाने (23) आणि नाराय़णने (26) चांगली भागिदारी करत संघाला विजयाजवळ नेले. अखेरच्या फलंदाजानी आवश्यक धावा करत संघाला 4 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

इतर बातम्या

धोनीची फटकेबाजी पाहून छोट्या मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू, मॅच संपल्यानंतर माहीकडून चिमुरडीला गोड गिफ्ट

The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश

DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!

(In RCB vs KKR match Royal challengers Banglore Lost match with 4 wickets KKR Won)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.