IPL 2021 : 2 वर्षानंतर मैदानात, केवळ 6 बॉल टाकले, वॉर्नरला चकवलं, तरीही हरभजनला फक्त एकच ओव्हर का?

IPL 2021 : 2 वर्षानंतर मैदानात, केवळ 6 बॉल टाकले, वॉर्नरला चकवलं, तरीही हरभजनला फक्त एकच ओव्हर का?
Harbhajan Singh

कोलकात्याचा कर्णधार ओयन मॉर्गनने (Eion Morgan) चेंडू फिरकीपटू हरभजनच्या (Harbhajan Singh) हाती सोपवला जो दोन वर्षानंतर खेळत होता. (Harbhajan Singh Only One Over)

Akshay Adhav

|

Apr 12, 2021 | 10:12 AM

चेन्नई :  आयपीएलच्या 14 व्या पर्वातील तिसरा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात पार पार पडला. या सामन्यात कोलकात्याने प्रथम बॅटिंग करताना 187 धावा फटकावल्या. हैदराबादचा सलामीवीर बॅटिंगसाठी मैदानात येताच कोलकात्याचा कर्णधार ओयन मॉर्गनने (Eion Morgan) चेंडू फिरकीपटू हरभजनच्या (Harbhajan Singh) हाती सोपवला जो दोन वर्षानंतर खेळत होता. पण म्हणतात ना शेर कभी बुढा नहीं होता. त्याने पहिले पाच बॉल अप्रतिम टाकले. त्यातल्या चौथ्या बॉलवर हैदराबादचा कर्धणार डेव्हिड वॉर्नरला (David Warner) त्याने चमकवलं. तो आऊट होता होता राहिला. सहाव्या चेडूंवर हरभजनला साहाने (Wriddhiman Saha) षटकार खेचला. हरभजजने एका ओव्हरमध्ये 8 धावा दिल्या. पण पहिली ओव्हर टाकणारा हरभजन नंतर गोलंदाजी करताना दिसला नाही. मग एवढी चांगली बोलिंग टाकूनही हरभजनला मॉर्गनने एकच ओव्हर का दिली? असा सवाल क्रिकेट फॅन्स आता विचारत आहेत. (IPL 2021 harbhajan Singh only one over Against Sunrisers Hydrabad KKR vs SH)

चाहत्यांना एक ना अनेक प्रश्न

कोलकात्याचा कर्णधार ओयन मॉर्गनने हरभजनला फक्त एक ओव्हर दिल्याने क्रिकेट फॅन्स हैरान आहेत. सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की मॉर्गनने हरभजनला फक्त एकच ओव्हर का दिली असावी, आणि दिली तर ती पहिलीच ओव्हर का दिली?, मॉर्गनच्या डोक्यात असं काय गणित होतं, की पहिल्या ओव्हरनंतर हरभजनला ओव्हर द्यायची नाही, असे एक ना अनेक सवाल आता क्रिकेट फॅन्स विचारु लागले आहेत.

हरभजनची पहिली ओव्हर कशी होती…?

कोलकाता नाईट रायडर्सकडून हरभजनने पहिली ओव्हर टाकली. हरभजनने पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन्स दिल्या. पहिल्या दोन बॉलवर हरभजनने ऋद्धिमान साहाला एकही रन दिला नाही. तिसऱ्या बॉलवर साहाने एक रन्स घेतला. चौथ्या बॉलवर हरभजन सिंहने डेव्हिड वॉर्नरला चकमा दिला. पॅट कमिन्सने वॉर्नरचा कॅच सोडला आणि नंतरच्या चेंडूवर त्याने हरभजनला जोरदार षटकार मारला.

आयपीएलमधील यशस्वी गोलंदाज

40 वर्षीय हरभजन सिंहने आयपीएलमधील 161 सामन्यांमध्ये आतापर्यंत 150 बळी घेतले आहेत. 18 धावा देऊन 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 150 पैकी 23 बळी त्याने चेन्नईकढून खेळताना मिळवल्या आहेत. तर उर्वरित सर्व बळी हे त्याने मुंबईकडून खेळताना मिळवले आहेत. आयपीएल 2013 चा हंगाम त्याच्यासाठी सर्वोत्तम होता. कारण या मोसमात त्याने 19 सामन्यांमध्ये 24 बळी मिळवले होते. या हंगामात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते. हरभजन सिंह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे. लसिथ मलिंगा (170), अमित मिश्रा (160), पियुष चावला (156), आणि ड्वेन ब्राव्हो (154) यांच्यानंतर हरभजनचा नंबर लागतो.

(IPL 2021 harbhajan Singh only one over Against Sunrisers Hydrabad KKR vs SH)

हे ही वाचा :

SRH vs KKR : शेर कभी बुढा नही होता! दोन संघांना IPL चषक मिळवून देणारा 40 वर्षीय खेळाडू मैदानात

SRH vs KKR, IPL 2021 Match 3 Result | कोलकाता ‘जितबो रे’, हैदराबादवर 10 धावांनी विजय

IPL 2021 :15 कोटीच्या पॅट कमिन्सला 19 वर्षीय अब्दुलने दाखवली ‘ताकद’, असा षटकार ठोकला की कायम आठवणीत राहिल!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें