IPL 2021: पंजाब किंग्सकडून ख्रिस गेलला वाईट वागणूक, माजी क्रिकेटपटूंचा मोठा आरोप

| Updated on: Oct 02, 2021 | 5:08 PM

दुबईत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील लढतीपूर्वी ख्रिस गेलने (Chris Gayle) बायोसेक्योर बबल सोडण्याची घोषणा केली.

IPL 2021: पंजाब किंग्सकडून ख्रिस गेलला वाईट वागणूक, माजी क्रिकेटपटूंचा मोठा आरोप
Follow us on

दुबई : दुबईत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील लढतीपूर्वी ख्रिस गेलने (Chris Gayle) बायोसेक्योर बबल सोडण्याची घोषणा केली. तो म्हणाला की, तो बराच काळ बायो बबलमध्ये आहे आणि टी-20 वर्ल्ड कप 2021 पूर्वी काही फ्रेश होण्यासाठी तो टीमचा बायोसेक्योर बबल सोडत आहे. गेलला टी – 20 विश्वचषकापूर्वी मानसिकरित्या फ्रेश व्हायचे आहे. तथापि, माजी क्रिकेटपटू आणि आता समालोचक असलेल्या केविन पीटरसन आणि सुनील गावस्कर यांना वाटते की, या निर्णयामागे इतर कारणे असू शकतात. (IPL 2021: Kevin Pietersen Feels Chris Gayle Not Being Treat Right by PBKS)

दोन्ही माजी क्रिकेटपटूंना असे वाटले होते की, पंजाब किंग्ज फ्रँचायझीने गेलला त्याच्या 42 व्या वाढदिवशी प्लेइंग इलेव्हनमधून वगळले, हा योग्य निर्णय नव्हता. गेल आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळला नाही. मात्र, त्याने पुढील दोन सामन्यांमध्ये पुनरागमन केले. दोन्ही सामन्यांमध्ये गेल फलंदाजीने काही विशेष करू शकला नाही आणि त्याने या सामन्यांमध्ये 14 आणि 1 धावा केली.

पीटरसनचा मोठा आरोप

कोलकाताविरुद्ध पंजाब सामन्यापूर्वी पीटरसन स्टार स्पोर्ट्सवर म्हणाला की, “वेस्ट इंडिजच्या या खेळाडूला पंजाब किंग्ज कॅम्पमध्ये चांगली वागणूक दिली जात नाही. त्यांनी गेलच्या वाढदिवशी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले नाही. त्याला बाजूला ठेवले. जर तो आनंदी नसेल तर त्याला हवे ते करू द्यायला हवं.

गेल गेमचेंजर आहे : सुनील गावस्कर

गावस्कर पुढे म्हणाले की, पंजाब किंग्सने गेलला त्याच्या कठीण काळात साथ द्यायला हवी होती. ख्रिस गेल हा गेम चेंजर आहे. जर तो संघात नसेल तर शंभर टक्के मोठे नुकसान आहे. मला माहित नाही की तो संघात आहे की नाही. त्याला संघाबाहेर ठेवण्यामागचं त्यांचं कॅलक्युलेशन काय तेच कळत नाहीये. नक्कीच त्याचे वय 40 पेक्षा जास्त आहे. परंतु गेलमध्ये खेळ बदलण्याची क्षमता आहे. तो एक मोठा गेमचेंजर आहे.

दीर्घ काळापासून गेल बायो बबलमध्ये

गेल सातत्याने एक बायो बबलमधून दुसऱ्या बबलमध्ये प्रवास करतोय. त्यामुळे त्याला थकवा जाणवत होता. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि आराम करण्यासाठी त्याने आयपीएल सोडले आहे. नुकत्याच संपलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या बबलमधून त्याने आयपीएल बबलमध्ये प्रवेश केला. कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत, संघातील सर्व खेळाडूंना नियमांचे पालन करावे लागत आहे.

इतर बातम्या

मंधानाचं शतक, भारतीय क्रिकेटपटू म्हणाली, ओ हसिना जुल्फोंवाली…., मग स्मृतीच्या उत्तराने बोलती बंद!

IPL 2021: मराठमोळ्या ऋतुराजसमोर फिके पडले सर्व फलंदाज, युएईत खास कामगिरी

IPL 2021: कर्णधार केएल राहुलची एकाकी झुंज यशस्वी, रोमहर्षक सामन्यात पंजाब 5 गडी राखून विजयी

(IPL 2021: Kevin Pietersen Feels Chris Gayle Not Being Treat Right by PBKS)