IPL 2021: ‘ती’ एकमेव गोष्ट तुम्हाला विजयी करेल; सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफची ऋषभ पंतच्या शिलेदारांना सूचना

आयपीएल 2021 मध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. शारजाह येथे होणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमनेसामने आहेत.

IPL 2021: 'ती' एकमेव गोष्ट तुम्हाला विजयी करेल; सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफची ऋषभ पंतच्या शिलेदारांना सूचना
DC vs KKR

मुंबई : आयपीएल 2021 मध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना खेळवला जाणार आहे. शारजाह येथे होणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमनेसामने आहेत. जो संघ आज हा सामना जिंकेल तो आयपीएल 2021 चा दुसरा फायनलिस्ट बनेल. आयपीएलच्या पिचवर दोन्ही संघांमध्ये आज 30 वा सामना होईल. यापूर्वी झालेल्या 29 सामन्यांपैकी 15 सामन्यांमध्ये कोलकात्याने बाजी मारली आहे, तर 13 सामने दिल्लीने जिंकले आहेत. 1 सामना अनिर्णीत राहिला होता. (IPL 2021, KKR Vs DC, Qualifier 2: ‘Clarity Of Mind’ Key Vs Kolkata Knight Riders, Feels Mohammad Kaif)

या मोसमात शारजाहमध्ये कोलकाता आणि दिल्ली यांच्यातील ही दुसरी लढत असेल. येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव केला होता, ज्यामध्ये सुनील नारायणला सामनावीर ठरवण्यात आले. शारजाहमध्येच, केकेआरने आरसीबीविरुद्ध एलिमिनेटर सामना देखील जिंकला आहे आणि त्यातही नारायण केकेआरच्या विजयाचा नायक बनला होता. त्यामुळे हे स्पष्ट आहे की दिल्लीविरुद्धच्या सामन्यातदेखील सुनील नारायणच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

कोलकाता आणि दिल्ली या दोन संघांमध्ये झालेल्या शेवटच्या 5 सामन्यांवर नजर टाकली तर केकेआरवर दिल्लीचा 3-2 ने वरचष्मा आहे. त्याचबरोबर शेवटच्या दोन सामन्यांपैकी एक सामना दिल्लीने तर एक सामना कोलकात्याने जिंकला आहे. केकेआरने या मोसमात शारजाहमध्ये 3 सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामने त्यांनी दिल्ली आणि RCB विरुद्ध खेळले आहेत, आणि या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांच्या गोलंदाजांनी एकही षटकार खाल्ला नाही. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएल 2021 मध्ये सर्वात कमी 60 षटकार ठोकणारा संघ आहे.

आकडेवारी पाहिली तर असं लक्षात येईल, की आजच्या सामन्यात कोलकात्याचं पारडं जड आहे. तसेच आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकात्याची कामगिरी अनेक पटींनी सुधारली आहे. त्यामुळे दिल्लीसाठी कोलकात्याविरुद्धचा सामना सोपा नसणार. मात्र ही गोष्ट विसरून चालणार नाही की, दिल्ली कॅपिटल्स हा संघ गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हा संघ गेल्या वर्षी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता, तसेच गेल्या वर्षीच्या स्पर्धेचा उपविजेता ठरला होता. हाच संघ यंदा गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. साखळी फेरीत दिल्लीने 10 सामने जिंकले होते. त्यामुळे दिल्ली जिंकणं कोलकात्यासाठीदेखील सोपं आव्हान नसेल.

शांत मन आणि स्पष्ट विचार आवश्यक

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफने संघातील खेळाडूंना महत्त्वाची सूचना केली आहे. ज्याच्या जोरावर संघ कोलकात्याला पराभूत करु शकतो, असे कैफला वाटते. कोलकाताविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्याआधी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत मोहम्मद कैफ म्हणाला की, संघाला मागील पराभव विसरून या सामन्यात खेळाव लागेल.

कैफ म्हणाला की, “उद्या एक मोठा दिवस आहे. तुम्ही दबाव कसा सहन करताय यावर सर्वकाही आहे. प्रत्येक सामन्यात दडपण असते, पण या सामन्यातील आव्हान वेगळे असते. आपण शांत राहून स्पष्ट विचार ठेवून मैदानात उतरलं पाहिजे. आम्ही सलग दोन सामने गमावले आहेत. मात्र कमबॅक करणे महत्त्वाचे आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यातील मागील पराभव आम्हाला विसरावा लागेल. आमच्याकडे अनेक मॅच-विनर खेळाडू आहेत. अनुभवी आणि फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंची कमतरता नाही.”

इतर बातम्या

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…

‘विराट कोहली एक अपयशी कर्णधार’, आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला

भारतीय संघाच्या T20 World Cup च्या वेळापत्रकात बदल, महत्त्वाच्या संघासोबतचा सामना रद्द!

(IPL 2021, KKR Vs DC, Qualifier 2: ‘Clarity Of Mind’ Key Vs Kolkata Knight Riders, Feels Mohammad Kaif)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI