RCB vs CSK, IPL 2021 Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, सामना कधी, कुठे, केव्हा?

एकीकडे एम एस धोनीच्या (MS Choni) नेतृत्वाखालील चेन्नई (Chennai Super Kings) तर दुसरीकडे विराटच्या (Virat kohli) नेतृत्वाखालील बंगळुरु (Royals Challengers Banglore) संघ एकमेकांना टक्कर देतील. (IPL 2021 RCB vs CSK Live streaming when and where to watch online free in marathi)

RCB vs CSK, IPL 2021 Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, सामना कधी, कुठे, केव्हा?
RCB vs CSK

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. एकीकडे एम एस धोनीच्या (MS Choni) नेतृत्वाखालील चेन्नई (Chennai Super Kings) तर दुसरीकडे विराटच्या (Virat kohli) नेतृत्वाखालील बंगळुरु (Royals Challengers Banglore) संघ एकमेकांना टक्कर देतील. आज दुपारी साडे तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना उभय संघांमध्ये खेळविण्यात येईल. (IPL 2021 RCB vs CSK Live streaming when and where to watch online free in marathi)

 बंगळुरु संघ गुणतालिकेत अग्रस्थानी तर चेन्नई 2 क्रमांकावर

विराटच्या नेतृत्वाखालील बंगळुरु संघ गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. बंगळुरुने 14 व्या मोसमाक 4 सामने खेळले आहेत. त्यापैकी सर्वच्या सर्व सामन्यात बंगळुरुने प्रतिस्पर्धी संघांना धूळ चारली आहे. तर धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज गुणतालिकेतल्या क्रमांक 1 आणि क्रमांक 2 च्या संघांमध्ये लढत होत आहे.

चेन्नई विजयी ‘चौकार’ मारणार की बंगळुरु ‘पंच’ मारणार?

बंगळुरुने पाठीमागील चार मॅचेस लागोपाठ जिंकल्या आहेत तर चेन्नईने पाठीमागील तीन मॅचेस एकापाठोपाठ एक जिंकल्या आहेत. बंगळुरुविरुद्धची चौथी मॅच जिंकून विजयाचा चौकार लगावण्याचा प्रयत्न चेन्नईचा संघ करेल. तर पूर्ण फॉर्मात असलेल्या बंगळुरुचा संघ विजयाचा पंच लगावण्यास सज्ज आहे.

सामना कधी आणि कुठे…?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (RCB vs CSK) यांच्यातील सामना आज 25 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

सामना किती वाजता सुरु होणार?

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 3.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 3 वाजता सामन्याच्या टॉस होईल.

लाईव्ह मॅच कुठे बघायला मिळेल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (RCB vs CSK) यांच्यातील पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला बघायला मिळेल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचं?

तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही बघू शकता. तसंच प्रत्येक ओव्हर्सच्या अपडेट्स, मॅचची अपडेट तुम्ही tv9marathi.com या वेबसाईटला देखील पाहू शकता.

(IPL 2021 RCB vs CSK Live streaming when and where to watch online free in marathi)

हे ही वाचा :

Video : ‘उडता चेतन’, हवेत सूर मारत अविश्वसनीय कॅच ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

IPL 2021 : ‘या’ गोष्टीत मोहम्मद सिराज बुमराहच्याही ‘एक पाऊल पुढे!’, आशिष नेहराचं मोठं वक्तव्य

Video : पॅट कमिन्सचा अवघड कॅच घेतल्यानंतर अति आनंद, रियान परागचं चर्चेतलं हे सेलिब्रेशन नक्की बघा…!

Published On - 12:12 pm, Sun, 25 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI