PL 2022: सलग 7 पराभव, कर्णधार फ्लॉप, 15.25 कोटींचा खेळाडू पहिल्याच चेंडूवर बोल्ड, तरीही प्रशिक्षकांकडून पाठराखण

| Updated on: Apr 22, 2022 | 1:41 PM

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खराब कामगिरी सुरूच आहे. गुरुवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि यासोबतच एक लज्जास्पद विक्रमही या संघाच्या नावावर झाला. मुंबईला सलग 7 वा पराभव पत्करावा लागला असून आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे.

PL 2022: सलग 7 पराभव, कर्णधार फ्लॉप, 15.25 कोटींचा खेळाडू पहिल्याच चेंडूवर बोल्ड, तरीही प्रशिक्षकांकडून पाठराखण
Rohit Sharma, Ishan Kishan
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खराब कामगिरी सुरूच आहे. गुरुवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि यासोबतच एक लज्जास्पद विक्रमही या संघाच्या नावावर झाला. मुंबईला सलग 7 वा पराभव पत्करावा लागला असून आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सलामीवीर इशान किशन यांची खराब कामगिरी. चेन्नईविरुद्ध मुंबई इंडियन्सचे हे दोन्ही सलामीवीर खातेही उघडू शकले नाहीत. रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि पहिल्याच चेंडूवर इशान किशन (Ishan Kishan) बाद झाला. मात्र, असे असतानाही मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक आपल्या कर्णधार आणि यष्टिरक्षकाचा बचाव करत आहेत.

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने याने रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामीवीरांचा बचाव केला आहे, जे धावा काढण्यासाठी झगडत आहेत. जयवर्धने म्हणाला की, जर ते बॉल चांगल्या प्रकारे हिट करुन शकत नसतील तर आम्हाला त्यांच्या फॉर्मची काळजी वाटेल. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रोहित अद्याप लयीत दिसलेला नाही. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. त्याने आतापर्यंत सात सामन्यांत केवळ 114 धावा केल्या आहेत.

मुंबईला इशान-रोहित शर्माची चिंता नाही!

चेन्नईने तीन विकेट्स राखून मुंबईला नमवल्यानंतर जयवर्धने म्हणाला, ‘प्रत्येक टीम आणि खेळाडूच्या आयुष्टात चढ-उतार सुरुच असतात. इशानने पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली आणि त्यानंतर त्याची कामगिरी घसरली. रोहित चांगले शॉट्स खेळतोय. त्याची सुरुवात चांगली होत आहे. रोहितप्रमाणेच इशानही धावा काढण्यासाठी धडपडत आहे, त्याला मुंबईने 15.25 कोटी रुपयांना विकत घेतले. या डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत सात सामन्यांत 191 धावा केल्या आहेत.

इशान-रोहित नेटमध्ये चांगली फलंदाजी करत आहे

जयवर्धने म्हणाला, इशान-रोहित नेटमध्ये चांगली फलंदाजी करत आहेत. मैदानावरही ते चांगले फटके खेळत आहेत. जर ते चेंडू नीट मारत नसते किंवा त्यांच्या खेळात आत्मविश्वास नसता तर काळजी करावी लागली असती. पण ते क्रीजवर आणि नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत आहेत.’ मुंबईला या मोसमात पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. त्यांनी सलग सात सामने गमावले आहेत.

इतर बातम्या

MI vs CSK IPL 2022: अरेरे, Rohit Sharma च्या नावावर IPL मधल्या सर्वात खराब रेकॉर्डची नोंद

MI vs CSK IPL 2022: इशान किशन खाली पडला, मुकेश चौधरीच्या जबरदस्त यॉर्करवर विकेट, Watch VIDEO

IPL 2022: CSK ला आणखी एक मोठा झटका, दीपक चाहर पाठोपाठ आणखी एक गोलंदाज बाहेर, नव्या ‘मलिंगा’चा संघात समावेश