Mumbai indians खेळाडूंसाठी डिझाइन करते स्पेशल प्रोग्रॅम, इशान किशनने सांगितलं यशाचं गुपित

"मुंबई इंडियन्सला मी आणि माझ्या खेळ माहित आहे. मी माझ्या फ्रेंचायजीला ओळखतो. मलाही मुंबई इंडियन्सकडूनच खेळायचं होतं. मी मुंबई इंडियन्सकडून गेल्या चारवर्षांपासून खेळतोय"

Mumbai indians खेळाडूंसाठी डिझाइन करते स्पेशल प्रोग्रॅम, इशान किशनने सांगितलं यशाचं गुपित
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 5:21 PM

मुंबई: IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये इशान किशन (Ishan kishan) सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) तब्बल 15.25 कोटी रुपये मोजून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. ऑक्शनच्यावेळी मुंबई इंडियन्सने अन्य खेळाडूंवर बोली लावताना इतका उत्साह दाखवला नाही. पण इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने आपली तिजोरी उघडली. काहीही झालं, तरी इशानला दुसऱ्या फ्रेंचायजीकडे जाऊ द्यायचं नाही, या इराद्याने बोली लावली. मुंबई इंडियन्सच्या संघात परतल्यामुळे इशान किशनही आनंदी आहे. आपल्याला घरच्या संघाकडून खेळायला मिळणार, अशी इशान किशनची भावना आहे. “मला संघात घेण्यासाठी मुंबई सर्वकाही करेल, याची मला कल्पना होती. पण वाढत जाणारी माझी किंमत हा माझ्यासाठी चिंतेचा विषय होता. कारण मुंबईला संघ बांधणीसाठी पैसे वाचवणं आवश्यक होतं” असं इशानने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

मी माझ्या फ्रेंचायजीला ओळखतो

“मुंबई इंडियन्सला मी आणि माझ्या खेळ माहित आहे. मी माझ्या फ्रेंचायजीला ओळखतो. मलाही मुंबई इंडियन्सकडूनच खेळायचं होतं. मी मुंबई इंडियन्सकडून गेल्या चारवर्षांपासून खेळतोय. आमचं खूप सुंदर नातं आहे. मुंबईकडून खेळताना आतापर्यंत दोन वेळा जेतपद मिळवलं आहे” असं किशन म्हणाला.

मुंबई इंडियन्सबद्दल काय सांगशील?

मुंबई इंडियन्सबद्दल काय सांगशील? त्या प्रश्नावर इशान म्हणाला की, “मुंबई इंडियन्सकडून खेळणं एक खूप सुंदर भावना आहे. तुमचं संघासोबत नातं तयार होतं. मुंबई इंडियन्सबद्दलची चांगली गोष्ट म्हणजे, आयपीएलचे फक्त दोन महिनेच तुम्ही त्यांच्यासोबत नसता. जिथे तुम्ही आलात, खेळलात आणि निघून गेलात. मुंबई इंडियन्सकडून तुम्ही खेळता, तेव्हा तुमच्यासाठी एक प्रोग्रॅम डिझाइन केलेला असतो. ज्यात तुमच्या डाएटपासून तुमची सप्लीमेंट, ट्रेनिंग असं सर्व काही त्यात असतं”

अलझारी जोसेफचं उदहारण घ्या…

“अलझारी जोसेफचं उदहारण घ्या. जेव्हा तो मुंबई इंडियन्सकडे होता, तेव्हा त्याला खांद्याची दुखापत झाली होती. त्यांनी पुढचे चार-पाच महिने जोसेफची काळजी घेतली. ते क्रिकेटपटूंमध्ये गुंतवणूक करतात. डेवाल्ड ब्रेविस ज्या वयात मुंबईच्या संघात आलाय, उद्या तो जेव्हा बाहेर पडेल, तेव्हा त्याच्या खेळात आणखी सुधारणा झालेली असेल” असं इशानने सांगितलं.

IPL 2022 Ishan kishan explains About Mumbai indians why it its family

Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.