AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 KKR vs PBKS Live Streaming: कोलकाता नाइट रायडर्स vs पंजाब किंग्स LIVE मॅच कधी, कुठे आणि कशी पाहू शकता?

IPL 2022 KKR vs PBKS Live Streaming: आयपीएल 2022 च्या (IPL 2022) आठव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्सचे (Punjab kings) संघ आमने-सामने येणार आहेत.

IPL 2022 KKR vs PBKS Live Streaming: कोलकाता नाइट रायडर्स vs पंजाब किंग्स LIVE मॅच कधी, कुठे आणि कशी पाहू शकता?
kkr vs kxip आयपीएल 2022 चा आठवा सामना Image Credit source: ipl/pbks
| Updated on: Mar 31, 2022 | 4:07 PM
Share

मुंबई: आयपीएल 2022 च्या (IPL 2022) आठव्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्सचे (Punjab kings) संघ आमने-सामने येणार आहेत. कोलकाताचा हा तिसरा तर पंजाब किंग्सचा दुसरा सामना आहे. याआधी झालेल्या दोन सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने एक सामना जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. पंजाबने पहिल्या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता. आपलं विजयी अभियान कायम ठेवण्याचा पंजाबचा प्रयत्न असेल. कोलकाताही आरसीबीकडून (RCB) झालेल्या पराभवानंतर विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमध्ये एक एप्रिलला हा सामना होणार आहे. कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 6 विकेटने पराभूत केलं होतं. दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने तीन विकेटने पराभूत केलं होतं. पंजाब किंग्सने स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध खेळला. या हाय स्कोरिंग मॅचमध्ये पंजाबने सहा चेंडू आणि पाच विकेट राखून विजय मिळवला.

KKR vs PBKS, IPL 2022: केव्हा आणि कधी बघू शकता कोलकाता नाइट रायडर्स vs पंजाब किंग्स सामन्याची LIVE Online Streaming

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स दरम्यान आयपीएल 2022 चा आठवा सामना कधी खेळला जाईल?

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स दरम्यान आयपीएल 2022 चा आठवा सामना शुक्रवारी एक एप्रिलला खेळला जाणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स दरम्यान आयपीएल 2022 चा सामना कुठे खेळला जाणार आहे?

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स दरम्यान सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स दरम्यान सामना कधी सुरु होईल?

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स दरम्यान सामन्याचा टॉस संध्याकाळी सातवाजता होईल. पहिला डाव संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल.

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स दरम्यानच्या सामन्याचं लाइव्ह टेलिकास्ट तुम्ही कुठे पहाल?

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स दरम्यान होणारा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनल्सवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहू शकता.

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्याचं ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पहाल?

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्सच्या सामन्याचं ऑनलाइन लाइव स्ट्रीमिंग Disney+Hotstar वर पाहू शकता. त्याशिवाय मॅचचे लाइव अपडेट्स Tv9marathi.com वर पाहू शकता.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.