Shreyas Ayer : KKRच्या हातात मॅच होती, पण श्रेयसची एक चूक महाग पडली

Shreyas Ayer : KKRच्या हातात मॅच होती, पण श्रेयसची एक चूक महाग पडली
कर्णधार श्रेयस अय्यर
Image Credit source: tv9

क्रिकेटमध्ये समोरचा संघ पाहून अनेक निर्णय ऐनवेळी घ्यावे लागतात. ऐनवेळी येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी क्रिकेट संघाचा कर्णधार देखील तितकाच निर्णयक्षम असावा लागतो. एक छोटासा निर्णय संघाला हरवू आणि जिंकवून देखील देऊ शकतो. असेच काही निर्णय कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्याकडून चुकले आहेत. त्यामुळे केकेआरला मोठं नुकसान सहन करावं लागलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 31, 2022 | 2:39 PM

मुंबई : क्रिकेटमध्ये समोरचा संघ पाहून अनेक निर्णय ऐनवेळी घ्यावे लागतात. ऐनवेळी येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी क्रिकेट संघाचा कर्णधार देखील तितकाच निर्णयक्षम असावा लागतो. कारण, कर्णधाराच्या प्रत्येक निर्णयावर संघाचं यश किंवा अपयश अवलंबून असतं. एक छोटासा निर्णय संघाला हरवू आणि जिंकवून देखील देऊ शकतो. असेच काही निर्णय कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Ayer) याच्याकडून चुकले आहेत. आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॉलेंजर्स बंगळुरू (RCB) आमने-सामने होते. यावेळी दोन्ही संघांनी पूर्ण ताकदीनिशी आपला संघ जिंकवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, श्रेयसचे काही निर्णय चुकले आणि त्याचा फटका कोलकाता नाईट रायडर्सला बसला. क्रिकेट किंवा कोणत्याही खेळात पराजय-विजय निश्चित आहे. मात्र, ज्या चुका झाल्या, जे निर्णय चुकले त्यावरही भाष्य व्हायला हवं, त्यावर चर्चा व्हायला हवी.  त्याने चुकांची पुनरावृत्ती टाळते आणि यशाचा मार्ग सुकर होतो.

श्रेयसचे निर्णय चुकले

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे व्यंकटेश अय्यर यांच्यासह सहा असे गोलंदाज त्यांच्याकडे पर्यायाच्या स्वरुपात होते. मात्र, कर्णधारानं घेतलेले बाराव्या ओव्हरपासून 18 व्या ओव्हरपर्यंतचे काही निर्णय चुकल्याचं दिसून आलं. हे निर्णय कोलकाता नाईट रायडर्सला इतके महागात पडले की त्यांना पराजयाचा सामना करावा लागला. तुम्ही जर गोलंदाजांविषयी बोलाल तर आंद्रे रसल याला सोडल्यास जवळपास सगळ्याच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. रसेलनं 2.2 ओव्हरमध्ये 36 धावा केल्या. याचा KKRला फायदाही झाला.

श्रेयसच्या निर्णयाने नुकसान

कर्णधार श्रेयस अय्यरने रसेलच्या सुरुवातीच्या दोन ओव्हर महागड्या पडल्यानंतर व्यंकेटेश अय्यरकडून 19 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करुन घेतली. मात्र, हेच कोलकाता नाईट रायडर्सला चांगलंच महागात पडलं. तो 19 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला आला आणि दहा रन त्याने खर्ची घातले. श्रेयस जर व्यंकटेशसोबत स्पिनर्सला 12 ते 15 ओव्हरमध्ये खेळवतो तर कोलकाता नाईट राईडर्ससाठी चांगली गोष्ट असली असती. केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने चार ओव्हरमध्ये 16 रन देऊन 2 विकेट घेतल्या.

काही निर्णय हरवून गेले

कॅप्टन फाफ डु प्लेसिस, विराट कोहली असे मोठे फलंदाज असलेल्या RCB ला कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी चांगलच सतावलं. आणखी 15-20 धावा कोलकात्याने केल्या असत्या, तर या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. मागच्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 205 धावा करणारा हाच तो आरसीबीचा संघ का? असा प्रश्न आजचा त्यांचा खेळ पाहून पडला. पण अखेरीस कसाबसा आरसीबीने हा सामना जिंकला.  त्यामुळे कोलकातानं गोलंदाजीने चांगलंच सतावलं पण अखेर आरसीबीने यश खेचून नेलं.

इतर बातम्या

Aurangabad | अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून, प्रियकराकडून निर्घृण खून, औरंगाबादच्या शफेपूरची घटना

PMC | पुणे महापालिकेचे ‘झुकेगा नही साला’ धोरण ; पथारी व्यावसायिकांकडून नव्या दराने आकारणार शुल्क

सतीश उके ED च्या ताब्यात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें