IPL 2022: मयंती परत येतेय, टीम इंडियातील क्रिकेटपटूची पत्नी

IPL 2022: मयंती परत येतेय, टीम इंडियातील क्रिकेटपटूची पत्नी
IPL 2022: मयंती लँगर
Image Credit source: instagram

क्रिकेटमध्ये पुरुष समालोचकांप्रमाणे महिला अँकर्सनीही (Women Anchors) स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या महिला अँकर्सचा मैदानावरील वावर नेहमीच चर्चेचा विषय असतो.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 21, 2022 | 11:02 PM

मुंबई: क्रिकेटमध्ये पुरुष समालोचकांप्रमाणे महिला अँकर्सनीही (Women Anchors) स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या महिला अँकर्सचा मैदानावरील वावर नेहमीच चर्चेचा विषय असतो. याच महिला अँकर्सपैकी एक नाव म्हणजे मयंती लँगर. मयंती लँगर (Mayanti Langer) हे नाव माहित नाही, असे क्रिकेटप्रेमी अभावानेच आढळतील. मयंती एक अनुभवी टेलिव्हिजन अँकर आहे. क्रिकेटसाठी ती विशेष ओळखली जाते. मैदानावर पुरुष क्रिकेटपटूंच्या मुलाखती ती अत्यंत सहजतेने घेते. आयपीएलच्या (IPL) आगामी सीजनमध्ये मयंती पुन्हा एकदा मैदानावर वावरताना दिसू शकते. आयपीएल 2022 मधून मयंती पुन्हा एकदा पदार्पण करणार आहे. मयंती गर्भवती होती. तिने बाळाला जन्म दिला. मातृत्वाची जबाबदारी निभावत असल्याने ती मागचे दोन सीजन क्रिकेटच्या मैदानापासून दूर होती. पण आता लवकरच ती IPL च्या ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग असणार आहे.

मयंती दिसली नाही, तेव्हा

आयपीएल 2020 च्या सीजनमध्ये मयंती दिसली नाही, त्यावेळी अनेक क्रिकेटप्रेमींना धक्का बसला होता. कारण सोशल मीडियावर मयंतीची मोठी फॅन फॉलोईंग आहे. मयंतीच्या अनुपस्थितीची चर्चा रंगल्यानंतर तिनेच सोशल मीडियावरुन आई झाल्याचं जाहीर केलं होतं. तिने भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी सोबत लग्न केलं आहे.

त्यांनी गरज असताना साथ दिली

“मागची पाच वर्ष स्टार स्पोर्ट्सने मोठी संधी दिली. मला गरज असताना ते माझ्यामागे उभे राहिले. मी गर्भवती असताना पहिले पाच महिने सूत्र संचालन करताना मला कुठली अडचण येऊ नये, यासाठी त्यांनी काळजी घेतली. स्टुअर्ट आणि मला सहा आठवड्यांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. आयुष्य बदलल आहे. काही चांगल्या गोष्टी घडत आहेत” असं मयंतीने 2020 च्या टि्वटमध्ये स्पष्टीकरण दिलं होतं.

फिल्मी लव्ह स्टोरी

मैदानावर असताच स्टुअर्ट बिन्नी आणि मयंतीची पहिली नजरानजर झाली. तिथून त्यांच्या प्रेमसंबंधांची सुरुवात झाली. 2012 मध्ये ते विवाहबद्ध झाले. दोघांची लव्हस्टोरी पूर्णपणे फिल्मी आहे. इंडियन क्रिकेट लीग दरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती. स्टुअर्ट बिन्नीचाच तिने पहिला इंटरव्ह्यू केला होता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें