‘तुझ्या सौंदर्याचं वर्णन शब्दात शक्य नाही, डेटवर येतेस का?’ चाहत्याच्या प्रश्नावर मयंती लँगरचं मजेदार उत्तर

'तुझ्या सौंदर्याचं वर्णन शब्दात शक्य नाही, डेटवर येतेस का?' चाहत्याच्या प्रश्नावर मयंती लँगरचं मजेदार उत्तर
मयंती लँगर

भारताचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी मयंती लँगर लोकप्रिय टीव्ही स्पोर्ट्स अँकर आहे. क्रिकेट विश्वात तिच्या खास अँकरिंगसाठी ती ओळखले जाते. (Fan Ask Mayanti Langer For Romantic Date She Intresting reply)

Akshay Adhav

|

May 20, 2021 | 9:26 AM

मुंबई :  गेल्या 5-10 वर्षात क्रिकेटला ग्लॅमर आलंय. फॅन्स थेट क्रिकेटपटू, क्रिकेट कॉमेंटेटर, शो अँकर यांच्याशी वन टू वन संवाद करु लागलेत. क्रिकेटपटूंपर्यंत किंवा आपल्या आवडत्या अँकरपर्यंत आपल्या भावना फॅन्स थेट पोहोचवतात… यामध्ये सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. आता हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण असं की स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर (Mayanti Langer) हिला एका फॅन्सने थेट ‘डेटवर येतेस का?’ असा प्रश्न विचारला. तिनेही चाहत्याची फिरकी घेतली. तिने जे उत्तर दिलं ते उत्तर वाचून चाहताही लाजला असेल आणि तिच्या हजरजबाबी स्वभावाची तारीफ केली असेल. (Fan Ask Mayanti Langer For Romantic Date She Intresting reply)

फॅन्सची मयंतीला डेटची ऑफर

भारताचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी मयंती लँगर लोकप्रिय टीव्ही स्पोर्ट्स अँकर आहे. क्रिकेट विश्वात तिच्या खास अँकरिंगसाठी ती ओळखले जाते. तिचे फॅन्स तिच्याशी ट्विटरवरुन संवाद साधत असतात. ती देखील चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असते. अशाच तिच्या एका चाहत्याने मयंतीला डेटवर येण्याची ऑफर दिली.

मी जेव्हा तुला पाहतो तेव्हा मला आयपीएल पाहायला काहीच अडचण येत नाही. जर मी इतका प्रभावशाली असलो असतो तर तुला डेटवर घेऊन गेलो असतो. तू किती सुंदर आहेस, याचं वर्णन मी शब्दा करु शकत नाही कारण माझ्याजवळ तेवढे शब्द नाहीत, असं ट्विट करुन चाहत्याने त्याची मन की बात मयंतीपर्यंत पोहोचवली!

मयंतीचं मजेदार उत्तर

फॅन्सने डेटवर जाण्याची दिलेली ऑफर मयंतीने एका अटीवर कबूल केली. ‘थँक्यू.. मला आणि माझ्या नवऱ्याला तुमच्यासोबत ज्वाईन व्हायला नक्की आवडेल’, असा मजेशीर रिप्लाय मयंतीने चाहत्याला दिला. मयंतीचा रिप्लाय वाचून तिचा चाहताही लाजला असेल. त्यालाही काही क्षण काय करु आणि काय नको, असं झालं असेल.

काही वेळा सेलिब्रेटी अशा कमेंटवर, ऑफर्सवर मौन पाळून असतात किंबहुना ते व्यक्त होत नाहीत. पण मयंती तिच्या दिलखुलास अंदाजासाठी ओळखली जाते. ती आपल्या मनातील भावना चाहत्यांपर्यंत नेहमी पोहोचवत असते. तसंच चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना तिचा असा मजेदार अंदाज पाहायला मिळतो.

(Fan Ask Mayanti Langer For Romantic Date She Intresting reply)

हे ही वाचा :

रोहित शर्मा की विराट कोहली, सर्वोत्तम कर्णधार कोण? मोहम्मद शमीचं बेधडक उत्तर

WTC Final : न्यूझीलंडच्या या 3 खेळाडूंपासून विराटसेनेला धोका, फायनल मारायचीय तर खेळाडूंपासून ‘बच के रहेना!’

भारतीय क्रिकेट संघाला मोठा दिलासा, या दोन दिग्गजांनी कोरोनाला हरवलं!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें