AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय क्रिकेट संघाला मोठा दिलासा, या दोन दिग्गजांनी कोरोनाला हरवलं!

अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh krishna) यांनी कोरोनाला हरवलं आहे. (Indian Bowler Amit Mishra And Prasidh krishna Corona test Negative)

भारतीय क्रिकेट संघाला मोठा दिलासा, या दोन दिग्गजांनी कोरोनाला हरवलं!
अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh krishna) यांनी कोरोनाला हरवलं आहे.
| Updated on: May 20, 2021 | 6:54 AM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) मोठा दिलासा मिळाला आहे. इंग्लंड दौऱ्यावर (India Tour Of England) जाण्याआधी संघातील दोन दिग्गजांनी कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली आहे. अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh krishna) यांनी कोरोनाला हरवलं आहे. बुधवारी अमित मिश्राची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियावरुन दिली तर प्रसिद्ध कृष्णाच्या कोरोना चाचणीबाबत पीटीआयने वृत्त दिलं. (Indian Bowler Amit Mishra And Prasidh krishna Corona test Negative)

आयपीएलदरम्यान अनेक खेळाडूंना तसंच संघ व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी गोलंदाज अमित मिश्रा आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नवोदित वेगवान बोलर प्रसिद्ध कृष्णा यांना कोरोनाने गाठलं होतं. पण या दोघांनीही आता कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर जाण्यावर जाण्याआधी भारतीय संघाला फार मोठा दिलासा मिळालेला आहे.

मी बरा झालोय, अमित मिश्राची माहिती

अमित मिश्राने ट्विट करुन आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली. मी आता कोरोनातून बरा झालोय, अशी खुशखबरी त्याने आपल्या चाहत्यांना दिली. सोबतच त्याने त्याच्यावर उपचार केलेल्या डॉक्टर्स आणि नर्स यांचे आभार मानले आहेत, त्यांना धन्यवाद दिले आहेत. त्याने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “कोरोना वॉरियर्स आपले नायक आहेत. कोरोनातून बरा झाल्यानंतर मी एवढंच म्हणू शकतो, आपण माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मी हृदयापासून मी तुमचे आभार मानतो. तुम्ही आणि तुमचा परिवार जे योगदान देता आहात, यासाठी खूप खूप आभार”

इंग्लंड दौऱ्यासाठी प्रसिद्ध कृष्णाची निवड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंदविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची निवड करण्यात आलीय. इंग्लंड दौऱ्यावर जायला काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. खेळाडूंची दौऱ्यावर जाण्याआधी खास तयारी सुरु आहे. अशातच प्रसिद्धचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने संघाला मोठा दिलासा आहे. तसंच प्रसिद्धलाही लवकर पूर्ववत होऊन दौऱ्यावर जाण्यासाठी तयारी सुरु करावी लागणार आहे.

भारतात कोरोनाचा विस्फोट

भारतात कोरोनाचा हैदोस सुरु आहे. दररोज लाखो लोकांना कोरोनाची बाधा होतीय तर हजारो जणांना कोरोनाने आपला जीव गमवावा लागत आहे. पाठीमागच्या 24 तासांत 4525 लोकांना कोरोनाने आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. कोरोनाकाळातला हा मृत्यूचा सर्वाधिक आकडा आहे. याअगोदर 18 मे रोजी 4329 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. आज हा आकडा क्रॉस करुन कोरोनाने अधिकच चिंता वाढवलीय.

(Indian Bowler Amit Mishra And Prasidh krishna Corona test Negative)

हे ही वाचा :

Video : ‘मैदान मारायचंय तर तयारी पाहिजे,’ इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी जीममध्ये घाम गाळतोय चेतेश्वर पुजारा

इंजीनिअर बनून भारतीय संघात प्रवेश, वेगाने भल्या भल्यांना धडकी भरवली, भारताचा सर्वाधिक यशस्वी वेगवान बोलर! वाचा…

Photo : नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने तोडलं RCB च्या चाहत्यांचं हृदय, आधी म्हणाली विराट माझा फेव्हरेट, आता म्हणते…

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.