IPL 2022: Mumbai Indians च्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवाग जिव्हारी लागेल असं बोलला, MI च्या फॅन्सना नाही पचवता येणार

IPL 2022: IPL 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पराभवाचा सिलसिला कायम आहे. पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने जिंकता येईल असा सामना हरला.

IPL 2022: Mumbai Indians च्या पराभवानंतर वीरेंद्र सेहवाग जिव्हारी लागेल असं बोलला, MI च्या फॅन्सना नाही पचवता येणार
मुंबई इंडियन्स-वीरेंद्र सेहवाग
Image Credit source: instagram
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 14, 2022 | 2:29 PM

मुंबई: IPL 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पराभवाचा सिलसिला कायम आहे. पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने जिंकता येईल असा सामना हरला. या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab kings) प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 198 धावा फटकावल्या. या धावसंख्येला पाठलाग करणं मुंबई इंडियन्सला जमलं नाही. त्यांनी निर्धारित 20 षटकात फक्त 186 धावाच केल्या. मुंबई इंडियन्सला हा सलग पाचवा पराभव आहे. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सला सलग पाच पराभवांना सामोर जावं लागलं आहे. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची टीम गुणतालिकेत तळाला शेवटच्या स्थानी आहे. प्लेऑफ पर्यंत पोहोचण्याचा मुंबईचा मार्ग देखील खडतर बनला आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर खूपच जिव्हारी लागणार वक्तव्य केलं आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना सेहवागच हे वक्तव्य कधीच आवडणार नाही.

मुंबई चाहत्यांना दिला न पटणारा सल्ला

वीरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आपली फेव्हरेट टीम बदलण्याचा सल्ला दिला आहे. दोन प्रमुख खेळाडूंच रनआऊट होणं, मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं मुख्य कारण असल्याचं सेहवागने सांगितलं. ओडियन स्मिथला नशिबाची साथ मिळाली. त्यामुळेच त्याने पंजाब किंग्सला मुंबई विरुद्ध विजय मिळवून दिला, असं सेहवागचं मत आहे. सूर्यकुमार यादव शेवटच्या षटकापर्यंत टिकला असता, तर ओडियन स्मिथच्या एका ओव्हरमध्ये 25 धावा सुद्धा शक्य झाल्या असत्या, असं सेहवागने म्हटलं आहे.

मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत तळालाच राहूं दे

“मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन टीम्सना यंदा पॉइंटस टेबलमध्ये तळालाच राहूं दे. मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनी आपली फेवरेट टीम बदलावी. दोन खेळाडू रनआऊट होणार, तेव्हा पराभवाचा धक्का बसणं स्वाभाविक आहे. तिलक वर्मा, कायरन पोलार्ड रनआऊट झाले. सूर्यकुमार यादव शेवटच्या षटकापर्यंत टिकला असता, तर ओडियन स्मिथच्या ओव्हरमध्ये 25 धावा सुद्धा वसूल केल्या असत्या” असं वीरेंद्र सेहवाग क्रिकबजशी बोलताना म्हणाला.

सामना कुठे पलटला?

“तिलक वर्माचं रनआऊट होणं मुंबईला घातक ठरलं. सूर्यकुमार यादव चांगली फलंदाजी करत होता, पण त्याने दोन फलंदाजांना रनआऊट केलं. पोलार्डच्या रनआऊट होण्यामध्ये सूर्यकुमार यादवची चूक होती. पण माझ्या मते तिलक वर्माचं रनआऊट होणं, सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. कारण तो कुठलाही धोका न पत्करता फलंदाजी करत होता. त्याने आणखी 20-30 धावा केल्या असत्या, तर पंजाबने स्वत:च सामना सोडला असता” असं सेहवागचं म्हणणं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें