AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians : सलग 5 वेळेस पराभूत होऊनही चॅम्पियन बनू शकतो इंडियन्स, फक्त हा फॉर्म्यूला वापरावा लागेल?

आयपीएलच्या 15व्या सीजनमध्ये सलग पाचवेळा मुंबई इंडियन्स पराभूत झाला आहे. मात्र, एक फॉर्म्यूला असा आही की त्याने मुंबई इंडियन्सला सहज यश मिळू शकतं. तो फॉर्म्यूला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Mumbai Indians : सलग 5 वेळेस पराभूत होऊनही चॅम्पियन बनू शकतो इंडियन्स, फक्त हा फॉर्म्यूला वापरावा लागेल?
मुंबई इंडियन्स कॅप्टन रोहित शर्मा Image Credit source: PTI
| Updated on: Apr 14, 2022 | 12:05 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL) पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पाच सामने खेळून देखील एकाही सामन्यात विजयी होऊ शकलेला नाही. या मुंबई इंडियन्सच्या (MI) आयपीएलमधील खालच्या दिशेला चाललेल्या प्रवासाकडे अनेक क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ चिंता व्यक्त करतायेत. यावरुन संघातील काही खेळाडूंच्या सुमार कामगिरीवरही बोललं जातंय. या संघाने आतापर्यंत तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलंय. मात्र, अशातच 2015 चा फॉर्म्यूला जर रोहित शर्माने वापरला तर पुन्हा मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहचू शकतो. तो फॉर्म्यूला नेमका काय आहे?, 2015 मध्ये भारताने म्हणजेच रोहित शर्माने असा कोणता फॉर्म्यूला वापरला होता की त्यात इंडियन्सला मोठं यश मिळालं? हाच फॉर्म्यूला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा फॉर्म्यूला वापरून मुंबई इंडियन्स सहज जेतेपद मिळवू शकतो.

MI संघ सर्वात तळाला

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने काय म्हटलं त्यापूर्वी कालच्या म्हणजेच बुधवारी पंजाब किंग्ससोबत झालेल्या सामन्यात मुंबईने काय केलंय, त्यावर एक नजर टाकूया. पंजाबने बुधवारी मुंबई इंडियन्सला 12 धावांनी नमवलं. मुंबईला विजयासाठी 199 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण मुंबई इंडियन्सला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 186 धावाच करता आल्या. मेगा ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने नव्याने संघ बांधणी केली आहे. पण अजूनही या संघाची घडी बसलेली नाही. मुंबई इंडियन्सची टीम अजूनही चाचपडतेय. पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला सहाव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सर्वात तळाला आहे. मुंबई इंडियन्सच्या या स्थितीवर कोणाला विश्वास बसणार नाही, पण हे आजचं वास्तव आहे.

2015च्या फॉर्म्यूल्याची गरज

2022 मधील आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये एक मोठा बदल झाला आहे. या सीजनमध्ये आयपीएलचे एकूण दहा संघ झाले आहेत. 2015 मध्ये आपयपीएलचे फक्त आठ संघ होते. आता दहा संघ असून देखील एका संघाला चौदा चौदा सामने खेळावे लागणार आहे. अशातच सलग पाच सामने हरलेल्या मुंबई संघाला आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचायचं आहे तर इंडियन्सला 2015चा फॉर्म्यूला वापरावा लागेल. त्यावेळी देखील इंडियन्स पहिल्या सहा सामन्यात सुरुवातीला फक्त एकच सामना जिंकला होता. त्यानंतर रोहित शर्माच्याच नेतृत्वात संघाने चांगला विजय मिळवला. प्लेऑफ पोहचून त्यावेळी इंडियन्सने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावलं होतं. तो फॉर्म्यूला यंदा वापरल्यास इंडियन्स पुढील सामने सहज जिंकू शकतो. मुंबई इंडियन्स उरलेले नऊ सामन्यातील एक किंवा दोन सामने पराजीत होत असेल तर इंडियन्सला नेट रनरेट आणि इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून रहावं लागेल.

इतर बातम्या

Pune crime : मावशीसह करत होता घरफोड्या, गुन्हे शाखेच्या पथकानं ठोकल्या बेड्या; लोणी काळभोरमधला प्रकार

Photo Gallery | मायेचा सोहळाः नाशिकमध्ये बिबट्या आई आणि पिल्लाची वनविभागाने घडवली भेट

उन्हाळ्यातील पुरळांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा अधिक!

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.