IPL 2022 PBKS vs SRH Live Streaming: जाणून घ्या पंजाब विरुद्ध हैदराबाद सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये सुपर संडेचा थरार दुप्पट होणार आहे. कारण या दिवशी डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. दिवसातल्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Punjab Kings vs Sunrisers Hyderabad) हे दोन संघ भिडणार आहेत.

IPL 2022 PBKS vs SRH Live Streaming: जाणून घ्या पंजाब विरुद्ध हैदराबाद सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
IPL 2022 PBKS vs SRH Live Streaming
Image Credit source: PBKS - SRH / Twitter
अक्षय चोरगे

|

Apr 16, 2022 | 6:50 PM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये सुपर संडेचा थरार दुप्पट होणार आहे. कारण या दिवशी डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. दिवसातल्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Punjab Kings vs Sunrisers Hyderabad) हे दोन संघ भिडणार आहेत. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन सघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळेल. पंजाब आणि हैदराबादमधला सामना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर (D Y Patil Sports Stadium) होणार आहे. दोन्ही संघ एकापेक्षा एक सरस असून दोघांनीही स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली होती, पण मागील दोन्ही सामने जिंकत हैदराबादने शानदार पुनरागमन केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाबचा संघदेखील मागील सामन्यात मुंबई इंडियन्सला नमवून आला आहे.

पंजाब किंग्सने आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी 3 जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. पंजाबचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या बाजूला सनरायझर्स हैदराबादची परिस्थितीही सामन्यांच्या बाबतीत अशीच आहे. फरक फक्त रनरेटचा आहे. सनरायझर्स हैदराबादनेही आतापर्यंत खेळलेल्या 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत परंतु मायनस रनरेटमुळे हा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.

SRH vs PBKS, IPL 2022: हैदराबाद विरुद्ध पंजाब सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जमधील सामना कधी खेळवला जाणार आहे?

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमधील सामना 17 एप्रिलला म्हणजेच रविवारी खेळवला जाणार आहे.

IPL 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्जमधील सामना कुठे खेळवला जाईल?

आयपीएल 2022 मध्ये, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.

आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज सामना कधी सुरू होईल?

आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यासाठी नाणेफेक दुपारी 3 वाजता होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता खेळाला सुरुवात होईल.

आयपीएल 2022 मधील सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना कुठे पाहता येईल?

आयपीएल 2022 मधील सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

डिस्ने+हॉटस्टार वर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जमधील सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग सदस्यत्वासह पाहू शकता. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स आणि कव्हरेज वाचता येईल.

इतर बातम्या

IPL 2022 DC vs RCB Live Streaming: जाणून घ्या दिल्ली विरुद्ध बँगलोर सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022, MI vs LSG : आज लखनौ मुंबईला रोखणार?, की इंडियन्सची विजयाची भूक यश खेचून नेणार?

IPL 2022, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा सलग पाचवेळा पराभव, आज विजयश्री खेचून आणण्याची संधी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें