IPL 2022 Points Table: सलग पाच पराभवानंतर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकतो का? समजून घ्या

काल झालेल्या सामन्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल झालाय. तिसऱ्या स्थानी पंजाब आला आहे. तर प्लेऑफमध्ये मुंबई पोहचणार का? जाणून घ्या मुंबईचं भवितव्य आणि तुमच्या आवडत्या संघाविषयी...

IPL 2022 Points Table: सलग पाच पराभवानंतर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकतो का? समजून घ्या
IPL 2022: Mumbai Indians Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 8:12 AM

मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधला सर्वात यशस्वी संघ आहे. या टीमने आतापर्यंत तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. अशी कामगिरी अजून दुसऱ्या कुठल्याही संघाला करता आलेली नाही. पण यंदाच्या सीजनमधला मुंबईचा खेळ पाहिला की, हाच तो संघ का? असा प्रश्न पडतो. एकापाठोपाठ एक मुंबई इंडियन्सला पाच पराभवांना सामोर जावं लागलं आहे. बुधवारी पंजाब किंग्सने (Punjab kings) मुंबई इंडियन्सला 12 धावांनी नमवलं. मुंबईला विजयासाठी 199 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण मुंबई इंडियन्सला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 186 धावांच करता आल्या. मेगा ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने नव्याने संघ बांधणी केली आहे. पण अजूनही या संघाची घडी बसलेली नाही. मुंबई इंडियन्सची टीम अजूनही चाचपडतेय. पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला सहाव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सर्वात तळाला आहे. मुंबई इंडियन्सच्या या स्थितीवर कोणाला विश्वास बसणार नाही, पण हे आजचं वास्तव आहे.

विकेट काढता आली नाही

मुंबई इंडियन्सला पावरप्लेच्या ओव्हर्समध्ये विकेट काढता आली नाही. पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवाल आणि शिखर धवनने फटकेबाजी केली. त्यांनी 97 धावांची सलामी दिली. मयंक आणि शिखरने सहजपणे मुंबईची गोलंदाजी खेळून काढली. पंजाब किंग्सकडून शिखर धवनने सर्वाधिक 70 आणि मयंक अग्रवालने 52 धावांची खेळी केली. त्यानंतर जितेश शर्मा 30 आणि शाहरुख खानने 15 केलेली फटकेबाजी सुद्धा महत्त्वाची ठरली. धवन-अग्रवालने पाया रचल्यानंतर या दोघांनी धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. जसप्रीत बुमराह वगळता मुंबईचा एकही गोलंदाज प्रभावी वाटला नाही. त्यांना पंजाबच्या फलंदाजांना वेसणच घालता आली नाही.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

कोण कुठल्या स्थानावर?

काल झालेल्या आरसीबी आणि सीएसकेच्या सामन्यानंतर पहिल्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. रॉयल्सने चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. दुसऱ्या स्थानी केकेआर आहे. केकेआरनं पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले असून दोन हरला आहे. कालच्या सामन्यानंतर पंजाब तिसऱ्यास्थानी आला आहे. त्यानंतर चौथ्या स्थानी एलएसजी. एलएसजीने पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहे. त्यानंतर पाच्या स्थानी गुजरात आहे.

इतर बातम्या

Chanakya Niti | मुलांच्या भविष्याबद्दल चिंतेत आहात ? तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी कायम लक्षात ठेवा

IPL 2022 RR vs GT Live Streaming: जाणून घ्या राजस्थान विरुद्ध गुजरात सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

Ambedkar Jayanti 2022 Live : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.