AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Points Table : आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये कुणाची आगेकूच, तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानी, जाणून घ्या

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील सोमवारी झालेल्या पंजब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये काय बदल झालाय. पाहुया

IPL 2022 Points Table : आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये कुणाची आगेकूच, तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानी, जाणून घ्या
गुजरात टायटन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानीImage Credit source: IPL
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 26, 2022 | 8:49 AM
Share

मुंबई: आयपीएल (IPL 2022) पंधराव्या सीजनचा सध्या सगळीकडे माहोल आहे. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील सोमवारी झालेल्या पंजब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या (PBKS vs CSK) सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल झालाय. यात कोणता संघ अव्वल स्थानी आहे. याविषयी नेहमी चर्चा होत असते. प्रत्येकाचा आवडता संघ असतो तो कोणत्या स्थानी आहे, हे जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडतं. दरम्यान, त्यापूर्वी कालच्या सामन्यात काय झालं ते जाणून घेऊया. काल पंजाबच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकात सहा बाद 176 धावा केल्या. अंबाती रायुडूची 39 चेंडूतील 78 धावांची खेळी व्यर्थ ठरली. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकला. पंजाबचा आयपीएलमधील हा चौथा विजय आहे. पंजाबच्या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफचा (Play off) मार्ग अधिक खडतर बनला आहे. चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. पॉइंटस टेबलमध्ये ते नवव्या स्थानावर आहेत. कालच्या सामन्यानंतर आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल झालाय.

पॉईंट्स टेबलमध्ये टॉप पाच संघ

आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या स्थानी आहे. गुजरातने सातपैकी सहा सामने जिंकले आहे. तर एक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यानंतर दुसऱ्या स्थानी हैरदाबाद संघ आहे. हैदराबाद संघाने सातपैकी पाच सामने जिंकले असून दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. तिसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. या संघाने एकूण सात सामने खेळल असून त्यापैकी पाच सामन्यात त्यांना यश आलंय तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. चौथ्या स्थानी लखनौ संघ आहे. या संघाने एकूण आठ सामने खेळले आहे. त्यापैकी त्याला पाच सामन्यात यश आलंय तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. पाचव्या स्थानी बंगलौर संघ असून त्याने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत . त्यापैकी या संघाला पाच सामन्यात यश आलंय तर तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

कालच्या सामन्यात काय झालं?

चेन्नईला या सामन्यात विजयाच्या आशा पल्लवित करता आल्या, त्या अंबाती रायुडूमुळे. रायुडूने आज खेळपट्टीवर आल्यापासून तुफान बॅटिंग केली. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत त्याने तुफान फटकेबाजी केली. त्याने 39 चेंडूत 78 धावा फटकावल्या. यात सात चौकार आणि सहा षटकार होते. पण मोक्याच्याक्षणी कागिसो रबाडाच्या यॉर्करवर तो बोल्ड झाला. ती गेमचेंजिग ओव्हर ठरली. चेन्नईच्या तीन विकेट आज झटपट गेल्या. पण ऋतुराज गायकवाड आणि रायुडूने दबाव न घेता खेळ सुरु ठेवला. ऋतुराजने 30 धावांची खेळी केली. धोनीने आठ चेंडूत 12 धावा केल्या. यात एक चौकार आणि एक षटकार होता.

इतर बातम्या

Skin : मेकअप काढण्यासाठी या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

PBKS vs CSK IPL 2022: पंजाबचा Rishi Dhawan असं वेगळं फेस मास्क घालून गोलंदाजी का करत होता? कारण आलं समोर

IPL 2022, PBKS vs CSK, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत चहल अव्वल स्थानावर, कोणत्या खेळाडूने केली आगेकूच, जाणून घ्या

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं