AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs RCB Jos buttler: आज जोस बटलरने चौकार नाही फक्त सिक्स मारले, लास्ट ओव्हरमध्ये बॅटिंगचा गियर बदलला

RR vs RCB Jos buttler: मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) सलामीवीर जोस बटलरने (Jos buttler) दमदार फलंदाजी केली.

RR vs RCB Jos buttler: आज जोस बटलरने चौकार नाही फक्त सिक्स मारले, लास्ट ओव्हरमध्ये बॅटिंगचा गियर बदलला
जोस बटलर ऑरेंज कॅपमध्ये पहिल्या स्थानी कायमImage Credit source: rr twitter
| Updated on: Apr 05, 2022 | 10:37 PM
Share

मुंबई: मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) सलामीवीर जोस बटलरने (Jos buttler) दमदार फलंदाजी केली. बटलरच्या फलंदाजीमुळेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्सला निर्धारीत 20 ओव्हर्समध्ये 169 पर्यंत पोहोचता आले. जोस बटलरने मागच्या दोन सामन्यांप्रमाणे आज आक्रमक सुरुवात केली नाही. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि डेविड विली या दोघांनी नव्या चेंडूने सुंदर गोलंदाजी केली. राजस्थानचा संघ तिसऱ्या-चौथ्या षटकापासून फटकेबाजी सुरु करतो. पण सिराज-विली जोडीने अचूक टप्प्यावर चेंडू टाकून बटलर आणि देवदत्त पडिक्कलच्या जोडीला जखडून ठेवलं. त्यामुळेच राजस्थानला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. जोस बटलरने आज संयमी आणि सावध फलंदाजी केली. चांगल्या चेंडूंना सम्मान देताना खराब चेंडू स्टेडियमच्या छतावर पाठवले.

चौथ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी

फटकेबाजी करण्याची संधी मिळाली, तेव्हाच चेंडू सीमापार पाठवले. अन्यथा एक-दोन धावा पळून काढल्या. देवदत्त पडिक्क्ल बरोबर बटलरने दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची चांगली भागीदारी केली. देवदत्तने 29 चेंडूत 37 धावा केल्या. संजू सॅमसन आज लवकर आठ धावांवर बाद झाला. शिमरॉन हेटमायरने बटलरला चांगली साथ दिली. 31 चेंडूत त्याने 42 धावा केल्या. यात चार चौकार आणि दोन षटकार होते. चौथ्या विकेटसाठी त्यांनी नाबाद 83 धावांची भागीदारी केली.

शेवटच्या षटकात गियर बदलला

शेवटच्या आकाश दीपच्या षटकात बटलर-हेटमायर जोडीने फलंदाजीचा गियर बदलला व 23 धावा वसूल केल्या. या षटकात तीन षटकार ठोकले. जोस बटलरच्य आजच्या खेळीचं वैशिष्टय म्हणजे त्याने सहा षटकार मारले. एकही चौकार मारला नाही.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.