IPL 2022, SRH vs KKR : केकेआरवर हैदराबादचा मोठा विजय, 176 धावांचं लक्ष्य केलं पूर्ण, गुणतालिकेत हैदराबादची आगेकुच

आज आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील सामना हैदराबादने जिंकला आहे. सनराइजर्स हैदराबादचा कोलकाता नाईट रायडर्सवर मोठा विजय झाला आहे. हैदराबादने 17 ओवर 3 बॉलमध्ये तीन बाद 176 धावा काढल्या आणि विजय खेचून आणला आहे.

IPL 2022, SRH vs KKR :  केकेआरवर हैदराबादचा मोठा विजय, 176 धावांचं लक्ष्य केलं पूर्ण, गुणतालिकेत हैदराबादची आगेकुच
हैदराबादचा विजयImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 11:46 PM

मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील सामना हैदराबादने (SRH) जिंकला आहे. सनराइजर्स हैदराबादचा कोलकाता नाईट रायडर्सवर (KKR) मोठा विजय झाला आहे. हैदराबादने 17 ओवर 3 बॉलमध्ये तीन बाद 176 धावा काढल्या आणि विजय  खेचून आणला आहे. हैदराबादचा कोलकात्यावर हा मोठा विजय मानला जातो आहे. आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये हैदराबाद संघात सर्वाधिक 71 धावा राहुल त्रिपाठीने काढल्या आहेत. राहुलने 37 बॉलमध्ये 71 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ 68 धावा एडन मार्करामने काढल्या आहे. त्याने 36 बॉलमध्ये 68 धावा काढल्या. यामध्ये सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर सत्रा धावा विलियमसन याने काढल्या. त्याने 16 बॉलमध्ये 17 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये चार चौकारांचा समावेश आहे.

हैदराबादचा मोठा विजय

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

पॉईंट्स टेबलमध्ये बदल

ही आमची रात्र नसल्याचं केकेआरचं ट्विट

कोलकाताचं टार्गेट केलं पूर्ण

कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला 176 धावांचं लक्ष्य दिलं होतं. आहैदराबादने टॉस जिंकत कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजीचं निमंत्रण दिलं. कोलकताच्या संघाने 20 ओवरमध्ये 8 बाद 175 धावा केल्या होत्या. नितीश राणाने 36 बॉलमध्ये सर्वाधिक 54 धावा काढल्या. नितीशने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर आंद्रे रसेलने 25 बॉलमध्ये 49 धावा काढल्या. यामध्ये रसेलने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. रसेलनंतर सर्वाधिक धावा श्रेयस अय्यरने धावा काढल्या. त्याने 25 बॉलमध्ये 28 धावा काढल्या असून 3 चौकार मारले आहेत. त्यानंतर फिंचने 5 बॉलमध्ये 7 धावा आणि 1 षटकार मारला. तर जॅक्सनने देखील 7 धावा काढून 1 षटकार मारला. नरेनने 2 बॉलमध्ये 6 धावा काढल्या. त्यापैकी 1 षटकार होता. तर व्यंकटेश अय्यरने देखील 6 धावा काढल्या. त्यापैकी 1 चौकार त्याने मारला. यानंतर अमन खान याने 5 धावा, कमिंसने 3 आणि उमेशने फक्त 1 रन काढलाय.  हैदराबादला अशा प्रकारे कोलकाता नाईट रायडर्सने 176 धावांचं लक्ष्य हैदराबादने पूर्ण करुन विजय मिळवला आहे.

इतर बातम्या

दादर स्टेशनबाहेर गदग-पद्दुचेरी एक्सप्रेसची धडक; एकाच रुळावरुन जात असल्याने अपघात, जीविताहानी नाही

IPL 2022, SRH vs KKR : कोलकाताकडून हैदराबादला 176 धावांचे टार्गेट, हैदराबाद टार्गेट पूर्ण करणार? की KKR जिंकणार?

दादर रेल्वे स्थानकाजवळ दोन रेल्वे एकमेकांवर आदळल्या, सर्व प्रवासी सुखरूप

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.