IPL 2022: Umran Malik चा वेगवान चेंडू बरगड्यांमध्ये बसला, मैदानावर कोसळला दिग्गज फलंदाज, वेदनेने विव्हळला

IPL 2022: उमरान मलिक सातवी ओव्हर टाकत होता. चौथा चेंडू त्याने शॉर्ट टाकला. मयंक अग्रवाल फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू थेट बरगड्यांना जाऊन लागला.

IPL 2022: Umran Malik चा वेगवान चेंडू बरगड्यांमध्ये बसला, मैदानावर कोसळला दिग्गज फलंदाज, वेदनेने विव्हळला
srh vs pbks Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 8:12 AM

मुंबई: पंजाब किंग्सने (Punjab kings) काल IPL लीगमधील अखेरच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 5 विकेट राखून विजय मिळवला. गोलंदाजांच्या शिस्तबद्ध प्रदर्शनाच्या बळावर पंजाबला हे शक्य झालं. पंजाबने मोसमाचा शेवट गोड केला. फलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर सनरायजर्स हैदराबादने (SRH) सात विकेट गमावून 157 धावा केल्या. पंजाबने हे लक्ष्य 15.1 षटकातच पार केलं. आयपीएलच्या Playoff फेरीसाठी आधीच चार संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे SRH vs PBKS हा सामना फक्त औपचारिकता मात्र होता. सनरायजर्स हैदराबादचा संघ थकलेला दिसला. खेळाडूंमध्येही विजयाची भूक दिसली नाही. पंजाबच्या फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. हा सीजन गाजवणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनने संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले.

स्वत:च्या पायावरही उभा राहू शकला नाही

पंजाब किंग्सने या सामन्यात भले विजय मिळवला असेल. पण त्यांच्या कॅप्टनला दुखापत झाली. सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आपल्या वेगवान चेंडूने कॅप्टन मयंक अग्रवालला घायाळ केलं. चेंडू इतका जोरात बसला की, मयंक स्वत:च्या पायावरही उभा राहू शकला नाही.

तो वेदनेने विव्हळत होता

उमरान मलिक सातवी ओव्हर टाकत होता. चौथा चेंडू त्याने शॉर्ट टाकला. मयंक अग्रवाल फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू थेट बरगड्यांना जाऊन लागला. चेंडू लागल्यानंतर मयंक जमिनीवर कोसळला. तो वेदनेने विव्हळत होता. तात्काळ फिजियो मैदानात धावत आले व त्यांनी उपचार केले. मयंक त्याच्या पुढच्याच षटकात आऊट झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये उमरान मलिक प्रचंड वेगात गोलंदाजी करतोय. गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यालाही उमरान मलिकचे चेंडू शेकलेत.

एक्स-रे काढावा लागणार

‘ही दुखापत आणखी वाढेल. मला एक्स-रे करण्याची आवश्यकता आहे’ असं मयंक म्हणाला. मयंककडे आराम करण्यासाठी वेळ आहे. आयपीएल नंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांसाठी त्याची निवड झालेली नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.