AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Points Table : पंजाबमुळे शेवटच्या दिवशी फेरबदल, असं आहे सीजनचं फायनल पॉइंट्स टेबल

26 मार्च पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत लीग स्टेजमध्ये एकूण 70 सामने खेळण्यात आले. काल रविवारी 22 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्समध्ये (SRH vs PBKS) लीग स्टेजचा शेवटचा सामना झाला.

IPL 2022 Points Table :  पंजाबमुळे शेवटच्या दिवशी फेरबदल, असं आहे सीजनचं फायनल पॉइंट्स टेबल
pbks vs srhImage Credit source: BCCI
| Updated on: May 23, 2022 | 7:37 AM
Share

मुंबई: IPL 2022 स्पर्धेच्या लीग स्टेजमधला शेवटचा सामना काल झाला. 26 मार्च पासून सुरु झालेल्या या स्पर्धेत लीग स्टेजमध्ये एकूण 70 सामने खेळण्यात आले. काल रविवारी 22 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्समध्ये (SRH vs PBKS) लीग स्टेजचा शेवटचा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा शेवटचा सामना खेळण्यात आला. या मॅचमध्ये पंजाब किंग्सने सनरायजर्स हैदराबादवर 5 विकेट राखून विजय मिळवला. या विजयामुळे सीजनच्या फायनल पॉइंट्स टेबलमध्येही (Points Table) बदल दिसून आला. पंजाबच्या क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा झाली. ते सहाव्या स्थानावर पोहोचले. पण SRH च्या स्थानात कुठलाही बदल झाला नाही.

कोण, कुठल्या स्थानावर जाणून घ्या….

लीगमधला अखेरचा सामना फक्त औपचारिकता मात्र होता. त्याने प्लेऑफच्या समीकरणांमध्ये काहीही बदल होणार नव्हता. कारण दोन्ही संघ तीन दिवस आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले होते. या सामन्याचा उद्देश फक्त मोसमाचा शेवट गोड करणं आणि पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या टीम्सच्या पुढे निघून जाणं, इथपर्यंतच होता. संपूर्ण सीजनमध्ये हैदराबाद आणि पंजाबच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. हैदराबादने पहिले दोन सामने गमावल्यानंतर चांगली लय पकडली होती. मात्र नंतर लागोपाठ सामने त्यांनी गमावले. अखेरचा सामना संपल्यानंतर हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर राहिला.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

टॉप फोरमध्ये या चार टीम्स

70 सामने पूर्ण झाले असून पॉइंट्स टेबलमध्ये टॉप फोरमध्ये गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे चार संघ आहेत. या चार टीम्समध्ये फक्त राजस्थान असा एकमेव संघ आहे, ज्यांनी विजेतेपद मिळवलं आहे. बँगलोरची टीम तीन वेळा फायनलमध्ये पोहोचली. पण एकदाही त्यांना विजेतेपद मिळवता आलं नाही. गुजरात आणि लखनौने या सीजनमध्ये डेब्यु केलाय. या चार टीम्समधून आयपीएलला नवीन विजेता मिळणार आहे.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.