Tilak Varma Debut, IPL 2022: Mumbai indians चा 19 वर्षाचा लेफ्टी, 150 च्या स्ट्राइक रेटने करतो बॅटिंग, कोण आहे तिलक वर्मा?

Tilak Varma Debut, IPL 2022: Mumbai indians चा 19 वर्षाचा लेफ्टी, 150 च्या स्ट्राइक रेटने करतो बॅटिंग, कोण आहे तिलक वर्मा?
तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी डेब्यू
Image Credit source: icc

Tilak Varma Debut, IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतून (IPL) अंडर 19 क्रिकेटमधील अनेक युवा खेळाडूंनी मोठ नाव कमावलं आहे. विराट कोहली, (Virat kohli) ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, इशान किशन अशी अनेक नाव आहेत.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Mar 27, 2022 | 4:40 PM

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतून (IPL) अंडर 19 क्रिकेटमधील अनेक युवा खेळाडूंनी मोठ नाव कमावलं आहे. विराट कोहली, (Virat kohli) ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, इशान किशन अशी अनेक नाव आहेत. सगळ्यांना लगेच संधी मिळत नाही. काही खेळाडूंना आयपीएलमध्ये प्रवेशासाठी वाट पहावी लागली. अशाच एका खेळाडूने रविवारी 27 मार्च रोजी आयपीएल 2022 मध्ये डेब्यु केला. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 19 वर्षाच्या तिलक वर्माला (Tilak Varma Debut) पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. हैदराबादच्या या डावखुऱ्या फलंदाजाला मागच्या महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. तिलक वर्माला मुंबई इंडियन्सने संघात घेतलं, तेव्हाच त्याला महत्त्वाची जबाबदारी मिळेल असं बोललं जात होतं. मुंबई इंडियन्सने सलामीच्या सामन्यातच त्याला संधी देऊन विश्वास दाखवला आहे.

मुंबईला इतक्या अपेक्षा असलेला हा खेळाडू कोण आहे?

तिलक वर्मा डावखुरा फलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो हैदराबादकडून रणजी करंडक, सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी आणि विजय हजार करंडक स्पर्धेत नियमितपणे खेळत आला आहे. हैदराबादकडून ओळख निर्माण करण्याआधीच वयाच्या 17 व्या वर्षी अंडर-19 क्रिकेटमधून त्याने स्वत:ची ओळख बनवली. 2020 सालच्या अंडर 19 वर्ल्ड कप टीममध्ये तिलक वर्मा होता. यशस्वी जैस्वाल, रवी बिश्नोई, कार्तिक त्यागी सारख्या उदयोन्मुख खेळाडूंबरोबर टीम इंडियासाठी तिलक वर्मा महत्त्वाची भूमिका बजावत होता. वर्ल्ड कप तिलक वर्मासाठी फार चांगला ठरला नाही. त्याने तीन डावात फक्त 86 धावाच केल्या. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली नव्हती. त्यावेळी यशस्वी, प्रिमय गर्ग आणि बिश्नोई सारख्या खेळाडूंना होता-हात विकत घेतलं होतं.

150 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग

तिलकने देशातंर्गत क्रिकेटमध्ये आपल्या खेळाचा जलववा दाखवला. मागच्या सीजनमध्ये त्याने चांगल्या धावा केल्या. 2021-22 मुश्ताक अली स्पर्धेत तिलकने 149 च्या स्ट्राइक रेटने 215 धावा केल्या. विजय हजारे करंडक स्पर्धेतही त्याने जबरदस्त फलंदाजी केली होती. यात एक शतकही होतं. 15 टी 20 सामन्यात 143 च्या स्ट्राइक रेटने 381 धावा केल्या आहेत. मेगा ऑक्शनमध्ये त्याचं नाव आल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेण्यासाठी पूर्ण ताकत पणाला लावली. 20 लाख बेस प्राइस असलेल्या तिलकला 1.70 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें