AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? रोहित शर्मा म्हणाला…

अक्षय पटेलने मारलेला चेंडू कॅच पकडताना त्याला अंदाज नाही आला अन्  तो बॉल त्याच्या कपाळावर लागला होता. सूर्याला  बॅटींगला आला खरा पण पहिल्याच चेंडूवर बाद झाला.  त्यामुळे सूर्या पुढील सामन्यात खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. 

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? रोहित शर्मा म्हणाला...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 12, 2023 | 2:41 AM
Share

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात पलटणने आपला विजय मिळवला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबईने दिल्ली संघावर मात करत यंदाच्या पर्वतीला आपला पहिला विजय मिळवला. मात्र सामन्यामध्ये एक मोठी गोष्ट झाली ती म्हणजे स्टार खेळाडू सूर्यकुमार याला दुखापत झाली होती. अक्षय पटेलने मारलेला चेंडू कॅच पकडताना त्याला अंदाज नाही आला अन्  तो बॉल त्याच्या कपाळावर लागला होता. सूर्याला  बॅटींगला आला खरा पण पहिल्याच चेंडूवर बाद झाला.  त्यामुळे सूर्या पुढील सामन्यात खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. 

पाहा रोहित काय म्हणाला?

सामना जिंकणे सर्वात महत्वाचे आहे. पहिल्या सामन्यापासून आम्ही मेहनत घेत आहोत. पहिला विजय नेहमीच खास असतो. आम्ही येथे नुकताच एक कसोटी सामना खेळलो, खेळपट्टी वेगळी दिसत होती. आमच्यासाठी चांगली भागीदारी असणे महत्त्वाचे होते. आमच्याकडे काही तरूण असे आहेत की आयपीएल खेळलेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यांना तो आत्मविश्वास देऊन ड्रेसिंग रूममध्ये निरोगी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. कठोर बदल करण्याची गरज नसल्याचं सांगत रोहितने अप्रत्यक्षपणे सूर्या खेळणार असल्याचं वाटत आहे.

सूर्याला चेंडू लागला 

बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला पण हा चेंडू सूर्यकुमार यादवच्या हातात होतात. पण झेल पकडण्याऐवजी हातातून तोंडावर आदळला आणि थेट षटकार गेला. त्यानंतर रोहित शर्मावर कॅमेरा गेला असता वैतागलेला दिसला. अक्षर पटेलनं अखेर 25 चेंडूत 54 धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीला 172 ही धावसंख्या उभारता आली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान

Follow Us
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...