AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 CSK | चेन्नई सुपर किंग्स टीमला प्लेऑफआधी मोठा झटका, घातक ऑलराऊंडर ‘आऊट’

चेन्नईने अजून प्लेऑफसाठी क्वालिफाय केलेलं नाही. केकेआर विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. त्यामुळे आता चेन्नईला उर्वरित आणि एकमेव दिल्ली विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्या आधी ऑलराउंडर बाहेर झाला आहे.

IPL 2023 CSK | चेन्नई सुपर किंग्स टीमला प्लेऑफआधी मोठा झटका, घातक ऑलराऊंडर 'आऊट'
| Updated on: May 15, 2023 | 10:23 PM
Share

मुंबई | चेन्नई सुपर किंग्सला 14 मे रोजी घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सकडून 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. कोलकाताने चेन्नईवर एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये तब्बल 11 वर्षांनंतर विजय मिळवला. केकेआरने या विजयासह प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या. तर पराभवामुळे चेन्नईला मोठा झटका लागला. चेन्नईची या पराभवामुळे प्लेऑफच्या प्रवास कठीण झाला आहे. त्यामुळे आता चेन्नईला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध होणारा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे चेन्नईसाठी पुढील प्रवास हा आव्हानात्मक असणार आहे.मात्र त्याआधी चेन्नईला झटका लागेल, अशी बातमी समोर आली आहे.

चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका

सीएसकेसाठी वाईट बातमी समोर आली आहे. सीएसकेचा स्टार ऑलराउंडर बाहेर झाला आहे. सीएसकेचा बेन स्टोक्स हा अजूनही अनफीट आहे. त्यामुळे स्टोक्स चेन्नईच्या साखळी फेरीतील अंतिम सामन्यानंतर मायदेशी इंग्लंडला रवाना होणार आहे. चेन्नईचं अजून प्लेऑफ प्रवेश निश्चित नाही. मात्र स्टोक्स प्लेऑफसाठी उपलब्ध नसेल. याबाबतची माहिती इएसपीएएन क्रिकइंफोच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

सीएसकेचा कोच काय म्हणाला?

बेन स्टोक्स आयपीएल 2023 च्या मोसमात आपली छाप सोडण्यात अपयशी सोडला. छाप सोडण्यासाठी तो तेवढा खेळलाच नाही. स्टोक्स अवघ्या 2 सामन्यात खेळला. या 2 सामन्यात स्टोक्सला बॅटिंग आणि बॉलिंगने काहीही करता आलं नाही. त्यानंतर पुढील सामन्यांमध्ये स्टोक्सला दुखापतीमुळे खेळताच आलं नाही. आता स्टोक्सच्या दुखापतीबाबत सीएसके कोच स्टीफन फ्लेमिंग याने माहिती दिली आहे. स्टोक्स आता बॉलिंग करण्यासाठी तयार नाही. मात्र बॅटिंगसाठी ऑप्शन म्हणून तो टीमसाठी उपयोगी पडू शकतो, असं स्टीफन फ्लेमिंग याने स्पष्ट केलं.

चेन्नईची या मोसमातील कामगिरी

चेन्नईने या मोसमात आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला आहे. तर 5 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एका सामन्यात पावसाने बॅटिंग केल्याने चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 पॉइंट देण्यात आला. त्यामुळे चेन्नईचे एकूण 15 पॉइंट्स आहेत. चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षानाबेंच, मथेशा पाथीराना, निशांत सिंधू, सुभ्रंश सिंह, अक्षांश सिंह, सेनापती रवींद्र सिंह , ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, सिसांडा मगाला, बेन स्टोक्स, अजय जाधव मंडल, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, आरएस हंगरगेकर आणि भगत वर्मा

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...