Ruturaj Gaikwad Marriage | ऋतुराज गायकवाड याचं ठरलं! पण नक्की कोणासोबत?

टीम इंडियाचा आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स टीमकडून खेळणाऱ्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याच्या घरी लवकरच बँड बाजा वाजणार असल्याचं समोर आलंय.

Ruturaj Gaikwad Marriage | ऋतुराज गायकवाड याचं ठरलं! पण नक्की कोणासोबत?
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 3:35 AM

मुंबई | क्रिकेट चाहत्यांसाठी 28 मे रोजीचा संडे हा सुपरसंडे ठरणार आहे. कारण चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 16 व्या मोसमातील चॅम्पियन होण्यासाठी काँटे की टक्कर होणार आहे. दोन्ही संघांना जोरदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक दिली आहे. आता या दोन्ही संघात एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या दरम्यान चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नईकडून खेळणारा टीम इंडियाचा स्टार बॅट्समन हा ऋतुराज गायकवाड आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायलमध्ये खेळणार नसल्याचं म्हटंल जात आहे.

ऋतुराज गायकवाड आयपीएल 16 व्या मोसमानंतर आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी लग्न करणार असल्याची चर्चा आहे. ऋतुराजला लग्नामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला मुकावं लागणार असल्याचं इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील द केनिंग्टन ओव्हलमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे 7 ते 11 जून दरम्यान करण्यात आलं आहे. तर 12 जून राखीव दिवल ठेवला गेला आहे. या अंतिम सामन्सासाठी ऋतुराजची टीम इंडियात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

आता आयपीएलच्या 16 व्या मोसमाची सांगतो होतेय 28 मे रोजी. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियातील बरेचसे खेळाडू हे आयपीएलमध्ये खेळत होते. त्यांच्या संघाचा प्रवास संपल्याने ते खेळाडू हे रवाना झाले. भारतीय खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केलीय.

तर आता आयपीएल संपल्यानंतर निवड झालेले उर्वरित खेळाडू हे लंडनला रवाना होणं अपेक्षित आहे. मात्र ऋतुराज याने लग्नामुळे मला पोहचायला विलंब होईल. मी 5 जूननंतर संघात सामील होईन, असं टीम मॅनेजमेंटला कळवलं. मात्र टीम मॅनेजमेंटने नकार दिल्याचं समजतंय. त्यामुळे ऋतुराजच्या जागी यशस्वी जयस्वाल याचा समावेश करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

“ऋतुराज गायकवाड याने आम्हाला त्याच्या लग्नाबाबत कळवलं. लग्नामुळे मला लंडनला लवकर निघता येणार नसल्याचं ऋतुराजने सांगितलं. पण मी टीमसोबत 5 जूननंतर जोडला जाईन, असंही ऋतुराज म्हणाला. मात्र हेड कोच राहुल द्रविड यांनी ऋतुराजच्या जागी बदली खेळाडूची मागणी केली. त्यामुळे आता यशस्वी लवकरच लंडनला रवाना होणार आहे”, अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिली.

महाअंतिम सामना हा 7 जूनपासून सुरु होतोय. तर रिपोर्टनुसार, ऋतुराज 5 जूननंतर संघात सामील होणार असल्याचं म्हटलं जातंय. पण यानंतर ऋतुराज सराव केव्हा करणार, असाही प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे कोच द्रविडने मागणी करताच निवड समितीने यशस्वीच्या नावावर बदली खेळाडू म्हणून शिक्कामोर्तब केलाय. तसेच यशस्वीला सराव करायलाही सांगितलय.

नवरीमुलगी कोण?

आता ऋतुराज याचं मराठी अभिनेत्री सायली संजीव हीच्यासोबत नाव जोडलं गेलं होतं. मात्र दोघांनीही आमच्यात काहीच नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ऋतुराजने वर्षांपूर्वी माझी विकेट फक्त बॉलरच घेऊ शकतो, अशी इंस्टा स्टोरी शेअर केली होती.

तर सायलीने एका मुलाखतीत आम्ही दोघे मित्र होतो. पण या सर्व चर्चांमुळे बोलणंही बंद झालंय. तसेच ऋतुराजचं दुसऱ्याशी लग्न होईल किंवा माझं दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीबरोबर लग्न होईल तेव्हा या चर्चा बंद होतील, असं सायलीने म्हटलं होतं. त्यामुळे आता ऋतुराजला नक्क कोणी बोल्ड केलंय, हे लवकरच स्पष्ट होईल.

'आम्ही सगळ्यांना उडवून टाकू', बघा दादांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद
'आम्ही सगळ्यांना उडवून टाकू', बघा दादांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद.
'माझ्या आईच आमच्यावर वचपा काढायची..', मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट
'माझ्या आईच आमच्यावर वचपा काढायची..', मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट.
करुणा शर्मा प्रकरणाचा सदावर्तेंनी सांगितला अर्थ, 'कुणालाही जबरदस्तीने'
करुणा शर्मा प्रकरणाचा सदावर्तेंनी सांगितला अर्थ, 'कुणालाही जबरदस्तीने'.
'यांना काय घेणं देणं...', सकाळचा भोंगा म्हणत दादांनी राऊतांना फटकारलं
'यांना काय घेणं देणं...', सकाळचा भोंगा म्हणत दादांनी राऊतांना फटकारलं.
'मुंडेंसमोरच कराडचा मला नको त्या ठिकाणी स्पर्श..', करुणा शर्मांचा आरोप
'मुंडेंसमोरच कराडचा मला नको त्या ठिकाणी स्पर्श..', करुणा शर्मांचा आरोप.
मी समाधानी नाही, इतके रूपये..., पोटगीच्या निर्णयावर करूणा शर्मा नाराज?
मी समाधानी नाही, इतके रूपये..., पोटगीच्या निर्णयावर करूणा शर्मा नाराज?.
'..ही सुरूवात', मुंडेंवर तृप्ती देसाईंची टीका अन् पुन्हा केली ती मागणी
'..ही सुरूवात', मुंडेंवर तृप्ती देसाईंची टीका अन् पुन्हा केली ती मागणी.
धनंजय मुंडे गोत्यात? करुणा शर्मांचे आरोप मान्य, दरमहिन्याला इतकी पोटगी
धनंजय मुंडे गोत्यात? करुणा शर्मांचे आरोप मान्य, दरमहिन्याला इतकी पोटगी.
'त्या' महिलांपर्यंत लाडकी बहीण पोहोचवण्यासाठी सरकारचा निर्णय, जीआर काय
'त्या' महिलांपर्यंत लाडकी बहीण पोहोचवण्यासाठी सरकारचा निर्णय, जीआर काय.
'तुझा संतोष देशमुख करू...', कराडच्या बातम्या बघणाऱ्यावर कोयत्याचे वार
'तुझा संतोष देशमुख करू...', कराडच्या बातम्या बघणाऱ्यावर कोयत्याचे वार.