AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav याचा ‘वरचा’ क्लास, विकेटकीपरच्या डोक्यावरुन खडेखडे सिक्स, व्हीडिओ व्हायरल

सूर्यकुमार यादव याला मैदानात कधीही कोणत्याही बाजूला फटका मारण्याची कला अवगत आहे. या 360 बॅट्समनने लखनऊ विरुद्ध असाच एक अफलातून शॉट मारलाय.

Suryakumar Yadav याचा 'वरचा' क्लास, विकेटकीपरच्या डोक्यावरुन खडेखडे सिक्स, व्हीडिओ व्हायरल
| Updated on: May 24, 2023 | 8:46 PM
Share

तामिळनाडू | मुंबई इंडियन्स टीमचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव  लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध इशान किशन आऊट झाल्यानंतर मैदानात आला. कॅप्टन रोहित शर्मा आणि इशान किशन आऊट झाल्याने मुंबई चांगल्या सुरुवातीनतर बॅकफुटवर गेली. मात्र सूर्याने आपल्या स्टाईलनेच बॅटिंग केली. सूर्याने पाचव्या ओव्हरमध्ये खणखणीत सिक्स मारला. सूर्याने मारलेल्या या सिक्सचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा युवा गोलंदाज यश ठाकूर पाचवी ओव्हर टाकत होता. या यशच्या बॉलिंगवर ओव्हरमधील सहाव्या बॉलवर विकेटकीपरच्या डोक्यावरुन सूर्याने खणखणीत सिक्स टोलवला. सूर्याच्या या डावातील हा पहिला सिक्स ठरला. सूर्याने आपला तडाखा असाच सुरु ठेवला. सूर्याने यानंतर नवव्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर पाठच्या दिशेने 78 मीटर लांब सिक्स खेचला.

सूर्याचा ‘वरचा’ क्लास

तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

सूर्यकुमारला दुसऱ्या बाजूने कॅमरुन ग्रीन यानेही चांगली साथ देत फटकेबाजी केली. यासह सूर्यकुमार आणि ग्रीन या दोघांन तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 28 बॉलमध्ये अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर पुढेही दोघांनी झंझावात सुरु ठेवला. मात्र नवीन उल हक याने ही सेट जोडी फोडली. नवीनने सूर्यकुमार यादव याला 11 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर कॅचआऊट केलं. सूर्याने 20 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने 33 धावांची खेळी केली

मुंबईमध्ये एक बदल

दरम्यान मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या या निर्णायक सामन्यासाठी एक पण मोठा बदल केला आहे. रोहित शर्मा याने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलाय. रोहितने कुमार कार्तिकेय याच्या जागी ऑफ स्पिनर ऋतिक शौकीन याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलाय. त्यामुळे आता रोहितचा हा निर्णय किती यशस्वी ठरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ आणि आकाश मधवाल.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कॅप्टन), आयुष बडोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि मोहसीन खान.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.