AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Final 2023 Ajinkya Rahane : टीम इंडियामध्ये कमबॅक करणारा अजिंक्य रहाणे धोनीबाबत एकाच वाक्यात लाखमोलाचं बोलला 

Ajinkya Rahane : यंदाच्या पर्वात रहाणेने अजिंक्यची दुसरं रूप पाहायला मिळालं. या कामगिरीच्या जोरावर त्याने परत एकदा टीम इंडियामध्ये पदार्पण केलं. याच पार्श्वभूमीवर सामना संपल्यानंतर बोलताना रहाणे याने धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं.

IPL Final 2023 Ajinkya Rahane : टीम इंडियामध्ये कमबॅक करणारा अजिंक्य रहाणे धोनीबाबत एकाच वाक्यात लाखमोलाचं बोलला 
| Updated on: May 30, 2023 | 6:15 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या फायनल 2023 सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरातचा सुफडा साफ करत  विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. सीएसकेने आयपीएलच्या ट्रीफवर पाचव्यांदा आपलं नाव कोरलं. मुंबई इंडिअन्सच्या नावावर हा विक्रम असून त्याची आता सीएसकेने बरोबरी केली आहे. चेन्नईच्या विजयामध्ये अजिंक्य रहाणे आणि ऋुतुराज गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यंदाच्या पर्वात रहाणेने अजिंक्यची दुसरं रूप पाहायला मिळालं. या कामगिरीच्या जोरावर त्याने परत एकदा टीम इंडियामध्ये पदार्पण केलं. याच पार्श्वभूमीवर सामना संपल्यानंतर बोलताना रहाणे याने धोनीबाबत मोठं वक्तव्य केलं.

काय म्हणाला अजिंक्य रहाणे?

या पर्वामध्ये मजा आली. मला संधी आणि पाठिंबा देत माझी भूमिका काय होती ते मला सांगण्यात आलं होतं. माझ्या खेळात अजिबात हस्तक्षेप न करत मला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. यामुळेच मी अशी बहारदार फलंदाजी करू शकलो, याचं सर्व श्रेय महेंद्रसिंग धोनी आणि टीम मॅनेजमेंटला जात असल्याचं अजिंक्य रहाणे म्हणाला.

अजिंक्य रहाणे याला टीम इंडियामधून डच्चू देण्यात आला होता. एकवेळ संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रहाणेचं आता परत कमबॅक करणं अशक्य वाटत होतं. मात्र यंदाची आयपीएल त्याच्यासाठी टीम इंडियामध्ये परत एकदा स्थान मिळवण्याासाठी शिडीसारखी ठरली. धोनीने त्याच्यावर दाखवलेला विश्वास आणि मिळालेली संधी या दोन्हीचं त्याने सोनं केलं. 16 व्या पर्वात रहाणेने सीएसकेसाठी सर्वात वेगवान अर्धशतक करत इतिहास रचला आहे. स्लो खेळतो म्हणून त्याच्यावर टीका होते पण त्याने 232 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेचं वेगळं रूप पाहायला मिळालं. टीकाकारांनी रहाणेचं क्रिकेट संपलं म्हणत त्याला हिणवलं होतं. मात्र पठ्ठ्याने आपल्या बॅटने उत्तर देत निवड समितीला संघात घेण्यासाठी भाग पाडलं.  येत्या वर्ल्ड टेस्ट फायनलमध्ये रहाणे इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.

सामन्याचा धावता आढावा 

गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 214 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे 5 ओव्हर कमी करत हे आव्हान 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं करण्यात आलं.या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेचे सलामीवीर ऋुतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांनी 74 धावांची सलामी दिली होती. दोघांना एकाच ओव्हरमध्ये नूर अहमद याने आऊट करत सामना फिरवला. त्यानंतर अजिंक्य रहाणेने 27 धावांची छोटेखानी खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली.

अजिंक्य रहाणेनंतर अंबाती रायडूनेही 19 धावा करत सामना खेचला. या दोघांनाही मोहित शर्माने आऊट करत सामना गुजरातच्या पारड्यात झुकवला होता. खरा गेम शेवटच्या ओव्हरमध्ये झाला. कारण 6 चेंडूत 13 धावांची गरज होती आणि पहिल्या चार चेंडूत 3 धावा आल्या त्यानंतर 2 बॉलमध्ये 10 धावा हव्या होत्या. त्यावेळी रविंद्र जडेजाने सिक्स आणि चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.