Gill First IPL Century : शुबमन गिल याचं विक्रमी शतक, क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये मारलीत शतक!

गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल याने शतक मारलं आहे. 56 बॉलमध्ये शुबमन गिलने आपलं शतक पूर्ण केलं, यामध्ये त्याने 13 चौकार आणि 5 षटकार मारले.

Gill First IPL Century : शुबमन गिल याचं विक्रमी शतक, क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये मारलीत शतक!
| Updated on: May 16, 2023 | 12:53 AM

मुंंबई : गुजरात टायटन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात गुजरात संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यामध्ये गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल याने शतक मारलं आहे. 56 बॉलमध्ये शुबमन गिलने आपलं शतक पूर्ण केलं, यामध्ये त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. या शतकासह शुबमन आयपीएल 16 व्या मोसमात शतक करणारा सहावा फलंदाज ठरला आहे. हॅरी ब्रूक, प्रभसिमरन सिंग, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव यांच्यानंतर शुबमन गिलचा या यादीमध्ये समावेश झाला आहे.

शुबमन गिलने  सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. अवघ्या 22 चेंडूत त्याने अर्धशतक तर त्यानंतर 56 चेंडूमध्ये आयपीएलमधील आपलं पहिलंवहिलं शतक झळकवलं आहे. या शतकासह शुबमन हा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.

शुबमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक, द्विशतक त्यासह टी-20 आणि कसोटमध्येही त्याने शतके केली आहेत. मात्र आयपीएलमध्ये त्याला शतक करता आलं नव्हत. आज गिलने राहिलेला हा रेकॉर्डही पूर्ण केला आहे.

 

गुजरात टायटन्स संघाकडून आयपीएलमध्ये पहिले शतक झळकावण्याचा विक्रमही शुभमन गिलच्या नावावर झाला आहे. याआधी आयपीएलमध्ये गुजरातसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बनवण्याचा विक्रम गिलच्याच नावावर होता. 2022 त्याने  पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात 96 धावा केल्या होत्या.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (w), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (c), डेव्हिड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी, टी नटराजन