AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs SRH : शुबमनच्या शतकानंतरही गुजरात टायटन्सला रोखलं, हैदराबादला ‘इतक्या’ धावांचं आव्हान

गुजरातकडून शुबमन गिलने शतकी खेळी करत एक बाजू लावून धरली होती. एकवेळ 200 पेक्षा जास्त धावा होतील असं सर्वांना वाटत होतं. परंतु हैदराबाद संघाने शेवटच्या षटकांमध्ये दमदार गोलंदाजी केली.

GT vs SRH : शुबमनच्या शतकानंतरही गुजरात टायटन्सला रोखलं, हैदराबादला 'इतक्या' धावांचं आव्हान
Shubman gill
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 15, 2023 | 11:23 PM
Share

मुंबई :  गुजरात टायटन्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात गुजरात 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन गिलने शतकी खेळी करत एक बाजू लावून धरली होती. एकवेळ 200 पेक्षा जास्त धावा होतील असं सर्वांना वाटत होतं. परंतु हैदराबाद संघाने शेवटच्या षटकांमध्ये दमदार गोलंदाजी केली.

गुजरात संघाची सुरूवात खराब झाली होती.  साहाला शून्यावरच भुवनेश्वर कुमारने माघारी पाठवलं होतं. मात्र त्यानंतर साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोघांनीही हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. शुबमन गिल शतक केल्यावर 1 काढून 101 धावांवर माघारी परतला. या खेळीमध्ये त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. तर साई सुदर्शन याने 47 धावा केल्या.

दोन्ही विकेट गेल्यावर गुजरातचे दर्जेदार फलंदाज बाकी होते. त्यामुळे धावसंख्या  सहज 200 पेक्षा होईल सर्वांना वाटलं होतं पण तसं काही झालं नाही. भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी आणि टी नटराजन या त्रिमुर्तींनी गुजरात संघाच्या मोठ्या धावसंख्येला फुलस्टॉप लावला.  हार्दिक पांड्या 8 धावा, डेव्हिड मिलर 7 धावा,  राहुल तेवतिया 3 धावा,राशिद खान 0 धावा आणि  दासुन शनाका नाबाद 9 धावा यांना मोठी खेळी करता आली नाही.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (w), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, दासुन शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद

सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी, टी नटराजन

Follow Us
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान