AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPl 2023 RCB vs GT : गुजरात टायटन्सचा आरसीबीवर ‘विराट’ विजय, पलटणची प्ले-ऑफमध्ये एन्ट्री

आरसीबीने दिलेल्या 198 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना शुबमन  गिल याच्या  शतकाच्या जोरावर आरसीबीला त्यांनी पराभवाची धूळ चारली आहे. मुंबई इंडिअन्स संघाने प्लेऑफच्या अंतिम चारमध्ये समावेश केला आहे.   

IPl 2023 RCB vs GT : गुजरात टायटन्सचा आरसीबीवर 'विराट' विजय, पलटणची प्ले-ऑफमध्ये एन्ट्री
| Updated on: May 22, 2023 | 12:37 AM
Share

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यामध्ये गुजरात संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीने दिलेल्या 198 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना शुबमन  गिल याच्या  शतकाच्या जोरावर आरसीबीला त्यांनी पराभवाची धूळ चारली आहे. 19.1 ओव्हरमध्ये गुजरातने हे आव्हान  पूर्ण केलं आहे. गुजरातच्या विजयासह आरसीबी प्ले-ऑफमधून बाहेर झाला असून चौथ्या स्थानी मुंबई इंडिअन्स संघ असून अंतिम चारमध्ये त्यांनी समावेश केला आहे.

विराट कोहली याने 101 धावांची शतकी खेळी केली होती, या दमदार खेळीच्या जोरावर आरसीबी संघाने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा काढल्या होत्या. एकवेळ अशी होती की गुजरात लक्ष्य पार करेल की नाही असं वाटत होतं. कारण सलामीला आलेला साहा तिसऱ्याच ओव्हरमध्ये बाद झाला. त्यामुळे गुजरात हा सामना गमावणार की काय असं वाटत  होतं. मात्र विजय शंकर आणि शुबमन गिल या दोघांमध्ये झालेली भागीदारी सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरला.

आता गुजरात संघाच्या विजयामुळे मुंबईसाठी प्ले-ऑफची दारे खुली झाली आहे. आता प्ले-ऑफमधील चार संघही समोर आले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर किंग्ज आणि मुंबई इंडिअन्स हे अंतिम चार संघ दाखल झाले आहेत. आता गुजरात आणि चेन्नई यांच्यामधील जिंकणारा संघ फायनलमध्ये धडक मारणार आहे. गुजरात किंवा चेन्नई यांच्यमधील ज्या संघाचा पराभव होईल त्यांचा सामना लखनऊ आणि मुंबई यांच्यातील विजयी संघासोबत असणार आहे.

विजय शंकर 53 धावांवर अर्धशतक करून बाद झालं मात्र गिल याने एक बाजू लावून धरली होती. सामना खिशात घातलाच त्यासोबत पठ्ठ्याने सिक्सर मारत यंदाच्या पर्वातील आपलं दुसरं शतकही पूर्ण केलं.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (W), हार्दिक पांड्या (C), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (W), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.