AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT In Final IPL 2023 | गिलच्या शतकाने मुंबईचं स्वप्न भंगलं, गुजरात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामना होणार आहे.

GT In Final IPL 2023 |  गिलच्या शतकाने मुंबईचं स्वप्न भंगलं, गुजरात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत
मोहित शर्माचा पलटणला 'पंच', गुजरातची फायनलमध्ये धडक, आता चेन्नई विरुद्ध आमनासामनाImage Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 27, 2023 | 12:16 AM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईसाठी दुर्दैवी ठरला. शुभमन गिलने मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पाठ फोडली. त्याच्या शतकी खेळीमुळे गुजरातने 20 षटकात 3 गडी गमवून 233 धावा केल्या आणि विजयासाठी 234 धावांचं आव्हान दिलं. पण मुंबईचा संघ 171 धावा करू शकला. शुभमन गिलचं शतक आणि मोहित शर्माचा पंच मुंबई इंडियन्सला चांगलाच बसला असं म्हणावं लागेल.

मुंबईचा डाव

गुजरातने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबईचा डाव अडखळत झाला. इशान किशन जखमी झाल्याने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून नेहल वढेरा रोहित शर्मासोबत मैदानात उतरला. पहिल्याच षटकात नेहल वढेराच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर कॅमरून ग्रीन आला पण जखमी झाल्याने रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने डाव सावरण्याचा प्रयत्न सुरु केला. पण रोहित शर्मा 8 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माची जोडी चांगली रंगली. पण ही जोडी फोडण्यात राशीद खानला यश आलं.

सूर्यकुमार याद 38 चेंडूत 61 धावा करून बाद झाला आणि मुंबईच्या विजयाचा आशा संपुष्टात आल्या. तो तंबूत परत नाही तोच विष्णु विनोद बाद होत परतला. त्यानंतर रांगच लागली. टिम डेविड, पियुष चावला, कुमार कार्तिकेय असे झटपट बाद झाले.

गुजरातचा डाव

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. शुभमन गिलच्या आक्रमक खेळीपुढे एकाही गोलंदाजाची चालली नाही. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने पहिल्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुभमन गिलने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. 10 षटकार आमि 7 चौकारांच्या मदतीने शुभमन गिलने 129 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे गुजरातने मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर साई सुदर्शन आणि हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी सुरुच ठेवली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.