AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Singh | लखनऊ हारता हारता जिंकली, रिंकू सिंह याची विस्फोटक खेळी 1 धावेमुळे वाया

कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या रिंकू सिंह याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात 67 धावांची तोडफोड खेळी केली. मात्र केकेआरचा अवघ्या 1 धावेने पराभव झाला.

Rinku Singh | लखनऊ हारता हारता जिंकली, रिंकू सिंह याची विस्फोटक खेळी 1 धावेमुळे वाया
| Updated on: May 21, 2023 | 12:14 AM
Share

पश्चिम बंगाल | लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 1 धावेनी चित्तथरारक विजय मिळवला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र केकेआराला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावाच करता आल्या. लखनऊने हारता हारता हा सामना जिंकला. रिंकू सिंह या युवा फलंदाजाने क्रिकेट चाहत्यांना शेवटच्या बॉलपर्यंत श्वास रोखून धरायला भाग पाडलं. मात्र रिंकूचे प्रयत्न अवघ्या 1 रनसाठी कमी पडले.

केकेआरची बॅटिंग

केकेआरची 177 धावांचं पाठलाग करताना चांगली सुरुवात झाली. जेसन रॉय आणि वेंकेटश अय्यर या दोघांनी 61 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर केकेआरचा 61 स्कोअर असताना वेंकटेश 24 धावांवर आऊट झाला. त्यानंतर लखनऊने कमबॅक करत केकेआरला ठराविक अंतराने झटके दिले.

केकेआरने एकामागोमाग एक विकेट्स गमावल्या. नितीश राणा 8, जेसन रॉय 45, रहमानुल्लाह गुरुबाद 10, आंद्रे रसेल 7, शार्दुल ठाकूर 3 आणि सुनील नारायण 1 केकेआरच्या या फलंदाजांनी वरीलप्रमाणे धावा केल्या. मात्र त्यानंतर आणि दरम्यान रिंकू सिंहने एक बाजू लावून धरली.

रिंकून 19 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलवर सलग 3 चौकार ठोकले. मग 2 धावा घेत स्वत:कडे स्ट्राईक ठेवली. त्यानंतर पाचव्या बॉलवर सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. तर सहावा बॉल डॉट राहिला. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज होती.

20 व्या ओव्हमधील थरार

वैभव अरोरा याने यश ठाकूर याच्या बॉलिंगवर रिंकूला एक धाव काढून स्ट्राईक दिली. त्यानंतर यशने रिंकूला वाईड बॉल टाकला. त्यामुळे आता 5 बॉलमध्ये 19 धावांची गरज होती. रिंकून दुसऱ्या बॉलवर धाव घेतली नाही. तिसऱ्या बॉलवरही रिंकूने एकेरी धावेसाठी नकार दिला. यशने चौथा बॉल वाईड टाकला. त्यामुळे आता 3 बॉलमध्ये 18 धावा हव्या होत्या.

रिंकूने चौथ्या बॉलवर खणखणीत सिक्स ठोकला. आता 2 बॉलमध्ये 12 धावा राहिल्या. रिंकूने पाचव्या बॉलवर चौकार ठोकला. त्यामुळे शेवटच्या बॉलवर 8 धावा पाहिजे होत्या. रिंकूने शेवटच्या बॉलवरही सिक्स खेचला. मात्र रिंकूचे प्रयत्न अवघ्या 1 रनसाठी अपुरे ठरले.रिंकूने 33 बॉलमध्ये नाबाद 67 धावांची खेळी केली. रिंकूने या खेळीत 4 सिक्स आणि 6 चौकार ठोकले.

लखनऊकडून रवि बिश्नोई आणि यश ठाकूर या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कृणाल पंड्या आणि के गौतम या दोघांनी प्रत्येकी 1 फलंदाजाचा काटा काढला. लखनऊने या विजयासह प्लेऑफसाठी प्रवेश मिळवला. तर केकेआरचं आव्हान संपुष्टात आलं.

लखनऊची बॅटिंग

दरम्यान त्याआधी केकेआरने टॉस जिंकला. कॅप्टन नितीश राणा याने लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. लखनऊकडून निकोलस पूरन याने सर्वाधिक 58 धावांची अर्धशतकी खेळी.

निकोलस व्यतिरिक्त लखनऊच्या 3 फलंदाजांनी 20 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र या तिकडीला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यात अपयश आलं. क्विंटन डी कॉक याने 28, प्रेरक मंकड याने 26 आणि आयुष बदोनी याने 25 धावांची खेळी केली. कृष्णप्पा गौतम याने नाबाद 11 आणि नवीन उल हक याने नॉट आऊट 2 धावा केल्या. कॅप्टन कृणाल पंड्या 9 रन करुन आऊट झाला. करण शर्मा याने 3 धावांचं योगदान दिलं. रवि बिश्नोई 2 रन करुन तंबूत परतला. तर मार्क्स स्टोयनिस याला भोपळाही फोडता आला नाही.

कोलकाताकडून सुनील नारायण, शार्दुल ठाकूर आणि वैभव अरोरा या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्थी या जोडीने 1-1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पंड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्क्स स्टॉयनिस, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, आयुष बदोनी, के गौथम, के शर्मा, रवि बिश्नोई, मोहसिन खान आणि नवीन-उल-हक.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कॅर्णधार), जेसन रॉय, रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.