LSG vs MI IPL 2023 : मुंबईला हरवून लखनऊला भलताच जोश चढला, कृणाल पंड्या बनला MS Dhoni, VIDEO

LSG vs MI IPL 2023 : लखनऊचा कॅप्टन कृणाल पंड्याने मैदानात CSK ची कॉपी मारली. रोहित-इशानने मिळून विजयाचा पाया रचला होता. पण 10.3 ओव्हर्समध्ये मुंबईला 88 धावा बनवता आल्या नाहीत. जिंकणारी मॅच मुंबईची टीम हरली.

LSG vs MI IPL 2023 : मुंबईला हरवून लखनऊला भलताच जोश चढला, कृणाल पंड्या बनला MS Dhoni, VIDEO
Krunal pandya IPL 2023
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 9:44 AM

लखनऊ : भारतच नाही, वर्ल्ड क्रिकेटमध्ये MS Dhoni फक्त एकच आहे. धोनीसारखा दुसरा कोणा नव्हता, ना कोणी असेल, ना कोणी बनेल. कृणाल पांड्याने एमएस धोनीसारखी कृती केली, तर याचा अर्थ इथे फॉलो करणं असा होतो. LSG ने लखनऊमध्ये मुंबई इंडियन्सला हरवलं. त्यानंतर त्यांनी तेच केलं, जे धोनी आणि CSK च्या टीमने चेपॉकवर केलं होतं. KKR विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सची टीम चेपॉकवर आपला शेवटचा साखळी सामना खेळली.

त्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीमने मैदानाला फेरी मारुन प्रेक्षकांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. या दरम्यान धोनी अँड कंपनीने आपल्या क्रिकेट फॅन्सना काही गिफ्ट सुद्धा दिले.

LSG ने काय केलं?

CSK ने चेपॉक मैदानावर जे केलं, तेच LSG टीमने लखनऊच्या इकाना स्टेडियमवर केलं. मुंबई इंडियन्सवरील विजयानंतर कॅप्टन कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली टीमने संपूर्ण ग्राऊंडवर फेरी मारली. सपोर्ट केल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.

लखनऊकडून कोण खेळलं?

लखनऊ सुपर जायंट्स टीमने घरच्या मैदानात विजयाने सीजनचा शेवट केला. 16 मे रोजी झालेल्या रोमांचक सामन्यात लखनऊने मुंबई इंडियन्सला 5 रन्सनी हरवलं.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

या मॅचमध्ये लखनऊच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 3 बाद 177 धावा केल्या. यात मार्कस स्टॉयनिसचे नाबाद 89 आणि कॅप्टन कृणाल पांड्यचे 49 रन्स महत्वाचे होते. 10.3 ओव्हर्समध्ये मुंबईच काय चुकलं?

मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 178 रन्सच टार्गेट होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी 5 बाद 172 धावा केल्या. मुंबईसाठी ओपनिंग जोडीने विजयाचा पाया रचला होता. पण मुंबईच्या अन्य फलंदाजांना त्यावर कळस चढवता आला नाही. रोहित आणि इशान जोडीने मिळून स्कोरबोर्डवर 90 धावा जोडल्या होत्या. पण त्यानंतरच्या 10.3 ओव्हर्समध्ये मुंबईला 88 धावा बनवता आल्या नाहीत. जिंकणारी मॅच मुंबईची टीम हरली.

Non Stop LIVE Update
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.