AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकर झाला भावूक, डेब्यू कॅप मिळताच रोहित शर्माला मारली मिठी, Video व्हायरल

केकेआरविरूद्धच्या सामन्यामध्ये अर्जुनला संधी मिळाली आहे. रोहित शर्माने अर्जुनला डेब्यू कॅप दिली त्यावेळी तो भावूक झालेला दिसून आला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकर झाला भावूक, डेब्यू कॅप मिळताच रोहित शर्माला मारली मिठी, Video व्हायरल
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 16, 2023 | 5:54 PM
Share

मुंबई : आयपीएलमध्ये तब्बल 10 वर्षांनी तेंडुलकर मुंबईकडून खेळताना दिसला. (MI vs KKR 2023) हा ज्युनिअर तेंडुलकर असून अखेर आज त्याला आयपीएलमध्ये डेब्यू (Arjun Tendulkar debue) करण्याची संधी मिळाली आहे. अर्जुन तेंडुलकर याला मुंबईने (MI) आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होतं मात्र त्याला खेळण्याची संधी दिली नव्हती. आजच्या सामन्यामध्ये त्याला  संधी मिळाली, रोहित शर्माने अर्जुनला डेब्यू कॅप दिली त्यावेळी तो भावूक झालेला दिसून आला.

पाहा व्हिडीओ-

रोहित शर्माने त्याला कॅप दिल्यानंतर अर्जुनने त्याला मिठी मारली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अर्जुनने मुंबईकडून पहिली ओव्हर टाकली यामध्ये त्याने 5 धावा दिल्या.

अर्जुनचा पहिला सामना पाहण्यासाठी तेंडुलकर कुंटंबिय उपस्थित होतं. अर्जुनची बहिण सारासुद्धा हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहे. स्वत: सचिनही सामना सुरू होण्याआधी अर्जुनला टिप्स देताना दिसला. पहिल्या सामन्यात त्याला विकेट मिळाली नाही, 2 ओव्हरमध्ये 17 धावा दिल्या तर आपल्या स्पेलमधील 6 बॉल त्याने निर्धाव टाकले.

सचिनचा आयपीएलमधील शेवटचा सामना

सचिनने आयपीएलमधील शेवटचा सामना याच मैदानावर खेळला होता. 13 मे 2013 रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध तेंडुलकरने 31 चेंडूत 38 धावा केल्या. दुखापतीनंतर त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच