Mumbai Indians IPL 2023 : दुनिया हिला देंगे वाल्या पलटनची ताकत काय? कमजोरी काय? समजून घ्या

Mumbai Indians News : Rohit Sharma यावेळी टेन्शन घेणार नाय, देणार. मुंबई इंडियन्सच्या टीमसमोर सध्या आव्हानांचा डोंगर दिसतोय. पण या टीमने चालू सीजनमध्ये आयपीएल जेतेपदाचा सिक्सर मारल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.

Mumbai Indians IPL 2023 : दुनिया हिला देंगे वाल्या पलटनची ताकत काय? कमजोरी काय? समजून घ्या
Mumbai indians Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 8:39 AM

Mumbai Indians News : IPL 2023 चा सीजन सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सची भरपूर चर्चा आहे. पलटनचे काही प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे या सीजनमध्ये मुंबईच काय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण मुंबईला कमी समजू नका. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये युवा खेळाडूंचा जोश भरलाय. या टीमध्ये आग आहे. ते समोरचा प्रतिस्पर्धी कितीही तगडा असला, तरी शॉक देऊ शकतात. यावेळी मुंबई इंडियन्सच्या टीमसमोर मागच्या सीजनमधील इतिहास पलटण्याच चॅलेंज आहे.

मुंबई इंडियन्सच्या टीमसमोर सध्या आव्हानांचा डोंगर दिसतोय. पण या टीमने चालू सीजनमध्ये आयपीएल जेतेपदाचा सिक्सर मारल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका.

मागच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच काय झालं?

IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची टीम लीग स्टेजमधून बाहेर गेली. 5 वेळा आयपीएलच विजेतेपद मिळवणाऱ्या या टीमने 14 पैकी फक्त 4 सामने जिंकले. 10 सामन्यात या दिग्गज टीमला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सची टीम मागच्या सीजनमध्ये पॉइंट्स टेबलमध्ये तळाला होती.

MI च्या टीममध्ये आग

यावेळी मुंबई इंडियन्सच्या टीमसमोर पॉइंट्स टेबलमधील स्थिती बदलण्याच लक्ष्य असेल. IPL 2023 सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमचा पहिला स्थानावर पोहचण्याचा उद्देश आहे.

मुंबईची मुख्य ताकत काय?

मुंबई इंडियन्सच्या बलस्थानाबद्दल बोलायच झाल्यास रोहित शर्मा यात टॉपवर आहे. रोहित शर्माच्या बॅटिंगमध्ये एकहाती सामना फिरवण्याची ताकत आहे. त्यानंतर त्याची कमालीची कॅप्टनशिप. मुंबई इंडियन्सची टीम यशस्वी ठरलीय, त्यात कॅप्टन रोहित शर्माचा महत्त्वाचा रोल आहे.

टीमचा एक्स फॅक्टर कोण?

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये यावेळी कायरन पोलार्ड खेळाडू म्हणून नसेल. पण टिम डेविडच्या रुपाने मुंबईला पोलार्डचा बॅकअप सापडलाय. मुंबईच्या टीममध्ये चांगेल पावर हिटर्स आहेत, ही सुद्धा एक जमेची बाजू आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर टीमची ताकत नाही, तर एक्स फॅक्टर आहे. त्याशिवाय सूर्यकुमार यादव, ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीन हे खेळाडू मुंबईच्या टीमला भक्कम बनवतात.

गोलंदाजीत काय कमतरता?

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीत काही कमतरता आहेत. पण स्पिन ब्रिगेडमध्ये पर्याय आहेत. जसप्रीत बुमराह, झाई रिचर्ड्सन नसल्यामुळे मुंबईची टीम कमकुवत भासत असली, तरी या टीमला कमी लेखून चालणार नाही. अशी आहे मुंबई इंडियन्सची टीम

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, रमनदीप सिंह, टिम डेविड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, डिवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह (बाहेर), अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, राघव गोयल, नेहल वधेरा, सॅम्स मुलानी, विष्णु विनोद, दुआन यानसेन, पीयूष चावला, कॅमरन ग्रीन, झाय रिचर्ड्सन (बाहेर).

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.