AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 MI vs PBKS Live Streaming | मुंबई इंडियन्स-पंजाब किंग्स आमनेसामने, सामन्याबाबत जाणून घ्या सर्वकाही

Mumbai Indians vs Punjab Kings Live Streaming | मुंबई इंडियन्स पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात घरच्या वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवून आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

IPL 2023 MI vs PBKS Live Streaming | मुंबई इंडियन्स-पंजाब किंग्स आमनेसामने, सामन्याबाबत जाणून घ्या सर्वकाही
| Updated on: Apr 21, 2023 | 10:25 PM
Share

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 22 एप्रिल रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलंय. या डबल हेडरमधील पहिला सामना हा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत सलग 2 सामन्यातील पराभवानंतर विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. तर पंजाब किंग्सने 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवलाय. तर तेवढ्याच सामन्यात पराभवही झालाय. त्यामुळे एका सामन्याचा अपवाद वगळला तर दोन्ही संघाची स्थिती सारखीच आहे. मुंबई पंजाबवर मात करुन विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पंजाबसमोर मुंबईची ही घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे. या सामन्यानिमित्ताने आपण सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याचं कधी खेळवण्यात येणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना हा 22 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याचं आयोजन कुठे?

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलंय.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात?

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

डिजीटल स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?

क्रिकेट चाहत्यांना मोबाईल आणि लॅपटॉपवर मुंबई विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.

पंजाब किंग्स टीम | शिखर धवन (कॅप्टन) सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत सिंग भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग, राहुल चहर, सिकंदर रझा, कागिसो रबाडा, ऋषी धवन, मोहित राठी, शिवम सिंग, भानुका राजपक्षे, बलतेज सिंग, विद्वत कवेरप्पा आणि गुरनूर ब्रार.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.