AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Orange and Purple Cap | पर्पल कॅपने डोकं बदललं, ऑरेन्ज कॅप कुणाकडे?

IPL 2023 Orange Cap and Purple Cap | मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यानंतर पर्पल कॅप आणि ऑरेन्ज कॅपच्या यादीत मोठा बदल झालाय.

IPL 2023 Orange and Purple Cap | पर्पल कॅपने डोकं बदललं, ऑरेन्ज कॅप कुणाकडे?
| Updated on: Apr 23, 2023 | 9:06 AM
Share

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 22 एप्रिल रोजी 2 सामने पार पडले. पहिला सामना हा लखनऊ विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आला. तर दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यानंतर जसे पॉइंट्स टेबलमध्ये बदल झालेत, तसेच ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या यादीतही काही बदल झाले आहेत. आयपीएलच्या एका मोसमादरम्यान सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. मोसमाअखेरीस ज्या गोलंदाज आणि फलंदाजाच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आणि धावा असतात, तो त्या ऑरेन्ज आणि पर्पल कॅपचा मानकरी ठरतो. तर मोसमादरम्यान या कॅपची अदलाबदल होत असते. एप्रिल 22 च्या 2 सामन्यानंतर या दोन्ही कॅप कुणाकडे आहेत, पहिल्या 5 खेळाडूंमध्ये कुणाचा समावेश आहे, हे आपण जाणून घेऊयात.

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने गुजरात विरुद्धच्या सामन्यात 68 धावांची खेळी केली. केएल राहुल याला त्याचा फायदा झाला. केएल राहुल याने यासह ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत पहिल्या पाचात धडक मारली आहे. केएल सीएसकेच्या डेव्हॉन कॉनवे याला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहचलाय. त्यामुळे डेव्हॉनची पाचव्या स्थानी घसरण झालीय. तर पाचव्या क्रमांकावर असलेला जॉस बटलर सहाव्या स्थानी घसरलाय.

पर्पल कॅपने डोकं बदललं

मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याआधी पर्पल कॅप आरसीबीच्या मोहम्मद सिराज याच्याकडे होती. मात्र पंजाबच्या अर्शदीप सिंह याने मुंबई विरुद्ध 4 विकेट्स घेत सिराजला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं. यामुळे पर्पल कॅपच्या पहिल्या 5 गोलंदाजांच्या यादीत कमालीचा बदल झालाय. सिराजची दुसऱ्या स्थानी घसरण झाल्याचा फटका मार्क वूड याला बसलाय. वूड दुसऱ्यावरुन थेट चौथ्या स्थानी आलाय. तर राशिदमुळे तिसऱ्या क्रमांकावरील युजवेंद्र पाचव्या क्रमांकाववर आला आहे.

टीमचं नावगोलंदाजाचं नाव एकूण सामने एकूण विकेट्स सर्वोत्तम कामगिरी
गुजरात टायटन्समोहम्मद शमी172811/4
गुजरात टायटन्समोहित शर्मा142710/5
गुजरात टायटन्सराशिद खान 172730/4
मुंबई इंडियन्स पीयूष चावला16 22 22/3
राजस्थान रॉयल्स युझवेंद्र चहल142117/4

ऑरेन्ज कॅपचं काय?

टीमचं नाव फलंदाजाचं नाव एकूण सामनेएकूण धावाहायस्कोअर
गुजरात टायटन्स शुबमन गिल17890 129
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुफाफ डु प्लेसिस 1473084
चेन्नई सुपर किंग्स डेव्हॉन कॉनव्हे16 672 92*
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली14639101*
राजस्थान रॉयल्सयशस्वी जयस्वाल14625 124

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, टिळक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | सॅम कुरन (कर्णधार), अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन,  जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत सिंग भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका.
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.