AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Orange and Purple Cap | शुबमन गिल याचं खणखणीत शतक, ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे?

IPL 2023 Orange Cap and Purple Cap | गुजरात टायटन्स टीमचा स्टार बॅट्समन शुबमन गिल याने धमाकेदार शतक ठोकलं. गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरातने मुंबईवर विजय मिळवला. यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे आहे बघा.

IPL 2023 Orange and Purple Cap | शुबमन गिल याचं खणखणीत शतक, ऑरेन्ज आणि पर्पल कॅप कुणाकडे?
| Updated on: May 27, 2023 | 12:44 AM
Share

अहमदाबाद | गुजरात टायटन्स टीमने मुंबई इंडियन्स टीमवर आयपीएल क्वालिफायर 2 मध्ये 62 धावांनी विजय मिळवला आहे.  गुजरातने मुंबईला विजयासाठी 234 धावांचं मजबूत आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 18.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 171 धावाच करता आल्या. मुंबईचा या विजयासह आयपीएलमधील प्रवास इथेच संपला. तर गुजरात टायटन्स टीमने सलग दुसऱ्यांदा आयपीएल अंतिम फेरीत धडक मारली आहे. शुबमन गिल आणि मोहित शर्मा हे दोघे गुजरात टायटन्सच्या विजयाची शिल्पकार ठरले.  शुबमनने  129 धावांची शतकी खेळी केली. तर मोहित शर्मा याने  5 विकेट्स घेतल्या.

मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक धावा केल्या. सूर्याने 38 बॉलमध्ये 61 धावांची खेळी केली. तिलक वर्मा याने 43 धावांचं योगदान दिलं. कॅमरुन ग्रीन 30 रन्स करुन माघारी परतला. या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. पियूष चावला याला भोपळा फोडण्यात अपयश आलं. गुजरातकडून मोहित शर्मा याने 2.2 ओव्हरमध्ये 10 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि राशिद खान या दोघांनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जोशुआ लिटिलने 1 पण धोकादायक कॅमरुन ग्रीन याची विकेट घेतली.

गुजरातची बॅटिंग

त्याआधी मुंबईने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. गुजरातकडून शुबमन गिल याने 60 बॉलमध्ये 7 फोर आणि 10 सिक्सच्या मदतीने 129 धावांची खेळी केली. शुबमन व्यतिरिक्त गुजरातकडून ऋद्धीमान साहा याने 18 धावा केल्या.

साई सुदर्शन 43 धावांवर दुखापत झाल्याने मैदानातून बाहेर पडला. तर हार्दिक पंड्या याने नाबाद 28 धावा केल्या. तर राशिद खान 5 धावा करुन नाबाद परतला. मुंबईकडून आकाश मढवाल आणि पियूष चावला या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

दरम्यान या सामन्यानंतर ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर मोठा बदल झाला आहे. शुबमन गिल याने ऑरेन्ज कॅप पटकावली आहे. शुबमनने 9 धावा करत आरसीबी कॅप्टन फाफ डु प्लेसीस याच्याकडे असलेली ऑरेन्ज कॅप हिसकावून घेतली. त्यामुळे फाफची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. तर तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि डेव्हॉन कॉनव्हे कायम आहेत.

टीमचं नाव फलंदाजाचं नाव एकूण सामनेएकूण धावाहायस्कोअर
गुजरात टायटन्स शुबमन गिल17890 129
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुफाफ डु प्लेसिस 1473084
चेन्नई सुपर किंग्स डेव्हॉन कॉनव्हे16 672 92*
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विराट कोहली14639101*
राजस्थान रॉयल्सयशस्वी जयस्वाल14625 124

तर दुसऱ्या बाजूला शमीने 2 विकेट्स घेत आपली पर्पल कॅप कायम ठेवली आहे. राशिद खान यानेही 2 विकेट घेतल्याने तो दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. मोहित शर्मा याने 5 विकेट्स घेतल्याने त्याची तिसऱ्या स्थानी एन्ट्री झालीय.  त्यामुळे पीयूष चावला याची चौथ्या क्रमांकावर घसरण झालीय.

टीमचं नावगोलंदाजाचं नाव एकूण सामने एकूण विकेट्स सर्वोत्तम कामगिरी
गुजरात टायटन्समोहम्मद शमी172811/4
गुजरात टायटन्समोहित शर्मा142710/5
गुजरात टायटन्सराशिद खान 172730/4
मुंबई इंडियन्स पीयूष चावला16 22 22/3
राजस्थान रॉयल्स युझवेंद्र चहल142117/4

चौथ्या स्थानी पीयूष चावला याल्याने युझवेंद्र चहल याची पाचव्या तर तुषार देशपांडे याची सहाव्या क्रमांकावर घसरण झालीय. आता गुजरात विरुद्ध चेन्नई अंतिम सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. ऑरेन्ज कॅप शर्यतीतील डेव्हॉन कॉनव्हे आणि शुबमन गिल, तर पर्पल कॅपमधील मोहम्मद शमी, मोहित शर्मा, राशिद खान आणि तुषार देशपांडे या 6 खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मढवाल.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.