AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सचा नाद नाय! क्वालिफायर 2 आधी पलटणसाठी गूडन्युज

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल क्वालिफायर 2 सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सचा नाद नाय! क्वालिफायर 2 आधी पलटणसाठी गूडन्युज
| Updated on: May 26, 2023 | 7:43 PM
Share

मुंबई | मुंबई इंडियन्स टीमने आयपीएल 2023 एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघावर 81 धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. मुंबईने या विजयासह क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. मुंबई 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्लेऑफमध्ये पोहचली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची ही 14 पैकी 11 विजय होता. विशेष बाब म्हणजे मुंबई 2017 पासून एकदाही प्लेऑफमध्ये पराभूत झालेली नाही. त्यामुळे मुंबईची ही आकडेवारी गुजरात टायटन्ससाठी धोक्याची घंटी आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्सही सावध झआी आहे. मुंबईने चेन्नईला 2019 मध्ये अंतिम सामन्यात पराभूत केलं होतं.

मुंबईची अद्भूत कामगिरी

मुंबईने लखनऊवर विजय मिळवत अद्भूत विक्रम केला आहे. मुंबईचा आयपीएल प्लेऑफमधील हा सलग 7 वा विजय ठरला आहे. मुंबई आयपीएल प्लेऑफच्या इतिहासात अशी कामगिरी करणारी पहिलीच टीम ठरली. चेन्नईची प्लेऑफमध्ये येण्याची यंदाची 12 वी वेळ आहे. मात्र त्यानंतरही चेन्नईला मुंबईप्रमाणे कामगिरी करता आली नाहीये.

मुंबईचा अखेरीस 2017 मध्ये प्लेऑफमध्ये तत्कालिन रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध पराभव झाला होता. तेव्हापासून मुंबई एकदाही प्लेऑफमध्ये पराभूत झालेली नाही. त्यामुळे धोनी-हार्दिक या चेन्नई आणि गुजरात कर्णधार सावध झाले आहेत.

मुंबईची प्लेऑफमधील कामगिरी

क्वालिफायर-2 2017 मध्ये मुंबईचा विजय IPL 2017 Final – मुंबई तिसऱ्यांदा चॅम्पिन IPL 2019 क्वालिफायर-1 मध्ये जिंकून मुंबई अंतिम फेरीत IPL 2019 Final जिंकून मुंबई चौथ्यांदा चॅम्पियन IPL 2020 क्वालिफायर-1 मध्ये दिल्लीला पराभूत करत फायनलमध्ये धडक IPL 2020 Final मध्ये दिल्लीवर मात करत सलग दुसरा आणि एकूण पाचवं विजेतेपद IPL 2023 ELiminator मध्ये लखनऊ सुपर जायंट्सवर 81 धावांनी विजय

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.