Kedar Jadhav | केदार जाधव याची IPL 2023 मध्ये अचानक भयानक एन्ट्री
आयपीएल 16 वा हंगाम आता हळुहळु शेवटाकडे चाललाय. पहिला टप्पा संपल्यानंतर आता प्रत्येक सामना रंगतदार होतोय. आता या दरम्यान एका स्टार खेळाडूची एन्ट्री झाली आहे.

मुंबई | आयपीएल 2023 चा पहिला टप्पा संपल्यानंतर प्लेऑफसाठीची चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक टीम आता आपला आगामी सामना जिंकून प्लेऑफच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये कालपर्यंत कॉमेंट्री करणारा मराठमोळा खेळाडू हा आता थेट मैदानात खेळताना दिसणार आहे. हा खेळाडू महेंद्रसिंह धोनी याचा विश्वासून खेळाडू मानला जातो. हा खेळाडू बदली म्हणून आयपीएलमध्ये जोडला गेला आहे.
मराठमोळ्या केदार जाधव याची आयपीएल 16 व्या मोसमादरम्यान एन्ट्री झाली आहे. केदार कालपर्यंत मराठीतून कॉमेंट्री करत होता. मात्र नशिब केव्हा पालेटल सांगता येत नाही, तसंच केदारसोबत घडलंय. केदारला या सिजनमध्ये कोणत्याही टीमने खरेदी केलं नव्हतं. केदार अनसोल्ड राहिला होता. मात्र आता केदार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमसोबत जोडला गेला आहे. केदारला 1 कोटी रुपयांच्या बेस प्राइजमध्ये आरसीबीने टीममध्ये घेतलंय. आरसीबी सोशल मीडिया टीमने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
केदार जाधव याची एन्ट्री
? ANNOUNCEMENT ?
Indian all-rounder Kedar Jadhav replaces injured David Willey for the remainder of #IPL2023.
Welcome back to #ನಮ್ಮRCB, Kedar Jadhav! ?#PlayBold @JadhavKedar pic.twitter.com/RkhI9Tvpi1
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 1, 2023
केदारची ऑलराउंडर डेव्हिड व्हीली याच्या जागी बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. व्हीली या मोसमात आरसीबीकडून फक्त 4 सामन्यात खेळला होता. यामध्ये त्याने फक्त 3 विकेट्स घेतल्या होत्या. व्हीलीचं टीममधून बाहेर पडण्याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही.
केदार जाधव याची आयपीएल कारकीर्द
केदार जाधव याने आयपीएलमध्ये 2010 साली पदार्पण केलं. तेव्हापासून केदार याने 93 सामन्यातील 80 डावांमध्ये 123.17 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 196 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 अर्धशतकाचा समावेश आहे. केदार आपला अखेरचा सामना हा 25 सप्टेंबर 2021 रोजी पंजाब किंग्स विरुद्ध खेळला होता. तेव्हापासून केदार आयपीएलमधून बाहेर होता. मात्र आता पुन्हा एकदा केदार साठी आयपीएलचे दार खुले झालेत. केदार बॉलिंग, बॅटिंग आणि विकेटकीपिंग अशा तिन्ही भूमिका चोखपणे पार पाडतो. त्यामुळे आता केदार या संधीचं सोनं कसं करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम | विराट कोहली (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, केदार जाधव, विजयकुमार विशक, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, फाफ डु प्लेसिस, दीप डु प्लेसिस, शर्मा, फिन ऍलन, अनुज रावत, मायकेल ब्रेसवेल, सिद्धार्थ कौल, सोनू यादव, मनोज भंडागे, वेन पारनेल, राजन कुमार, अविनाश सिंग आणि हिमांशू शर्मा.
