AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli | 2 सामने 2 शतक, विराट कोहली याने का म्हटलं टी 20 करिअर संपलंय

विराट कोहली याने आयपीएल 16 व्या हंगामात 2 शतकं ठोकली. विराटने गुजरात टायटन्साधी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध शतक ठोकलं होतं.

Virat Kohli | 2 सामने 2 शतक, विराट कोहली याने का म्हटलं टी 20 करिअर संपलंय
| Updated on: May 22, 2023 | 2:30 AM
Share

बंगळुरु | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचा स्टार बॅट्समन आणि माजी कर्णधार विराट कोहली याने अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध शतक ठोकलं. विराटच्या या शतकाच्या जोरावर आरसीबीने गुजरातला विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं. विराट कोहली याचं हे आयपीएल 16 व्या हंगामातील दुसरं शतक ठरलं. विराटने याआधी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध शतक ठोकलं होतं. विराट कोहली याने गुजरात टायटन्स विरुद्ध शतक करत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. विराट आयपीएलमध्ये ख्रिस गेल याला मागे टाकत सर्वाधिक शतक करणारा फलंदाज ठरला. विराटच्या नावावर आता 7 आयपीएल शतकं झाली आहेत. तर ख्रिस गेल याने 6 वेळा शतक केलं होतं. विराटने या शतकी खेळीसह टीकाकाराचं थोबाड बंद केलं.

विराट कोहली याला सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2022 या 3 वर्षांचा काळ क्रिकेटर म्हणून फार वाईट गेला. विराटला त्याच्या लौकीकाला साजेसा असा खेळ करता आला नाही. विराटला धावांसाठी झगडावं लागत होतं. या दरम्यानच्या काळात विराटला एकही शतक करता आलं नाही. मात्र विराटला 2022 मध्ये अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात सूर गवसला विराटने शतक करत कमबॅक केलं. तेव्हापासून ते आतापर्यंत विराट धमाका करतोय.

विराट कोहली काय म्हणाला?

विराटने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रोडक्शनमध्ये संवाद साधला. या दरम्यान विराटचं टी 20 करिअर संपलय म्हणाऱ्यांना विराटने सुनावलं. विराटच्या टी 20 करियरला उतरण लागल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. विराटवर न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डूल याने आयपीएल 16 व्या मोसमात स्ट्राईक रेटवरुन निशाणा साधला होता. आता विराटने म्हटलं की मी पुन्हा माझ्या कारकीर्दीत सर्वोत्तम टी 20 क्रिकेट खेळत असल्याचं म्हटलं.

“मी अशाच पद्धतीने टी 20 क्रिकेट खेळतो. गॅपमध्ये फटका मारण्यावर आणि चौकार ठोकण्यावर माझा विश्वास आहे. तसेच डावाच्या शेवटी परिस्थितीनुसार मोठे फटके मारतो. मला स्वत:च्या कामिगिरीबाबत चांगलं वाटतंय. मी ज्या प्रकारे खेळतोय त्यामुळे मला हायसं वाटतंय”, असं विराटने स्पष्ट केलं.

आरसीबी आऊट, विराटचं शतक वाया

दरम्यान गुजरातने आरसीबीने दिलेलं 198 धावांचं आव्हान शुबमन गिल याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. गुजरातच्या या विजयाने प्लेऑफमध्ये चौथी टीम म्हणून मुंबई इंडियन्सची एन्ट्री झाली. तर आरसीबीची पतंग गुल झाली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज आणि विजयकुमार वैशाख.

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार), शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि यश दयाल.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.