AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : रोहित शर्मा आऊट की नॉट आऊट? वादानंतर आयपीएलचा व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा काय ते

IPL 2023 : आयपीएल 2023 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. एक एक सामना महत्त्वाचा ठरत आहे. मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. तर रोहित शर्माची विकेट वादाचा विषय ठरली आहे.

Video : रोहित शर्मा आऊट की नॉट आऊट? वादानंतर आयपीएलचा व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा काय ते
MI vs RR : रोहित शर्मा आऊटच होता, नव्या Video मुळे सोशल मीडियावर चर्चेला पूर्णविराम
| Updated on: May 01, 2023 | 8:45 PM
Share

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रोमांचक अशा सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स संघावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्स संघाने 20 षटकात 7 गडी गमवून 212 धावा केल्या आणि विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. मुंबईने हे आव्हान 19.3 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. मात्र विजयी लक्ष्याचा पाठलाग करत असताना रोहित शर्माची विकेट पडली आणि मुंबईचा संघ अडचणीत आला. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मात्र आता एका व्हिडीओमुळे वादाचं कारण ठरलं आहे. मात्र आयपीएलने एक व्हिडीओ जारी करत खरं काय आणि खोटं काय हे स्पष्ट केलं आहे.

रोहित शर्मा बाद झाला तेव्हा राजस्थानचा कर्णधार आणि विकेटकीपर संजू सॅमसन स्टंपच्या जवळ उभा होता. असा दावा केला जात होता की, संजू सॅमसनने ग्लोव्ह्ज लावून बेल्स पाडली आणि पंचांनी चुकीचा निर्णय दिला. मात्र आयपीएलच्या एका व्हिडीओमुळे सगळं काही स्पष्ट झाला आहे.

रोहित शर्मा त्रिफळाचीत झाला होता

आयपीएलच्या नव्या व्हिडीओनुसार रोहित शर्मा क्लिन बोल्ड होता. नव्या अँगलच्या व्हिडीओमुळे चेंडू बेल्सला लागून पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. संजू सॅमसनचा हात बेल्सपेक्षा खूपच लांब होता. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर काही फरक पडला नाही. कारण त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजय मिळवून दिला.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यात 184 धावा केल्या. या सामन्यात 23 च्या सरासरीने धावा केल्या. रोहित शर्माने या पर्वात एकच अर्धशतक झळकावलं आहे. मुंबई गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्सने 8 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. अजून सहा सामने खेळायचे आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला 6 पैकी 4 सामने गरजेचं आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला चांगली फलंदाजी करावी लागेल. मुंबईचा पुढचा सामना पंजाब किंग्सवर 3 मे रोजी आहे.

मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.