AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 | कोरोनाचा वाढता धोका, आयपीएल रद्द होणार?

आयपीएलच्या 16 व्या मोसमात कोरोनाची एन्ट्री झाली आहे. टीम इंडियाचा माजी अनुभवी खेळाडूला कोरोनाची लागण झाली. तसेच भारतात वाढत चालेल्या कोरोनानंतर अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर.

IPL 2023 | कोरोनाचा वाढता धोका, आयपीएल रद्द होणार?
| Updated on: Apr 06, 2023 | 6:24 PM
Share

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमाला धडाक्यात सुरुवात झाली. आतापर्यतं यशस्वीपणे 8 सामने पार पडले. इमपॅक्ट प्लेअर, वाईड- नो बॉल रिव्हीव्यू यासारख्या नव्या नियमांमुळे या मोसमात नवी रंगत पाहायला मिळतेय. तसेच जिओ सिनेमावर एकूण 12 भाषांमध्ये सामना पाहता पाहता आपल्या भाषेत कमेंट्री ऐकण्याची चाहत्यांची सोय करण्यात आलीय. त्यामुळे गेल्या 15 मोसमांच्या तुलनेत हा 16 वा हंगाम वरचढ ठरलाय. आतापर्यंत सर्व काही निट सुरु होत. मात्र क्रिकेट चाहत्यांना ज्याची भीती होती तेच झालंय. आयपीएलवर कोरोनाचं सावट आहे. यामुळे एकूण 10 संघाना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. आता या आदेशांमुळे काही दिवसांनी हा मोसमही अर्ध्यात स्थगित होणार का, अशी भीती क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळतेय.

मिळालेल्या माहितानुसार, आयपीएल संघाच्या मालकांनी खेळाडूंना हॉटेलच्या रुममधून वारंवार न निघण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय सॅनिटायजर आणि मास्कचा उपयोग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शहरात कोरोनाचा धोका सद्यपरिस्थितीत जास्त आहे तिथे खबरदारीचे आदेश फ्रँचायजींकडून टीमला देण्यात आले आहेत. तर सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप बीसीसीआयकडून कोरोनाबाबत काहीही आदेश देण्यात आलेले नाहीत.

आयपीएलमध्ये विविध देशांमधील खेळाडू सहभागी झाले आहेत. खेळाडूंव्यतिरिक्त सपोर्ट स्टाफची संख्याही जास्त आहेत. भारतातील वविध राज्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे आयपीएलवरही कोरोनाचं सावट आहे.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 4 हजार 435 जणांना कोरोनाची बाधा झाली. तसेच कोरोनामुळे गेल्या 24 तासात छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, ओडिशा आणि पंजाबमध्ये अनुक्रमे प्रत्येकी 1 जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आयपीएलमध्ये कोरोनाची एन्ट्री

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये समालोचन करत असलेला आकाश चोप्रा यालाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. मला कोरोनाने क्लिन बोल्ड केलंय. अशी माहिती स्वत आकाश चोप्रा याने दिली होती.

दरम्यान आयपीएलमध्ये आज (6 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील इईन गार्डनवर करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....