AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhanashree Verma : चहलच्या बायकोसोबत पार्टीमध्ये दिसला टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू, Photos व्हायरल होताच गदारोळ

Dhanashree Verma : IPL 2023 चा सीजन सुरु असताना युजवेंद्र चहलची बायको धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोघांचा फोटो समोर येताच चर्चांना उधाण आलय. कुठल्या पार्टीमध्ये दोघे एकत्र दिसले?

Dhanashree Verma : चहलच्या बायकोसोबत पार्टीमध्ये दिसला टीम इंडियाचा 'हा' खेळाडू, Photos व्हायरल होताच गदारोळ
Dhanashree VermaImage Credit source: instagram
| Updated on: Apr 09, 2023 | 9:59 AM
Share

Dhanashree Verma Viral Photos: टीम इंडियाचा जादुई फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आयपीएल 2023 मधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने 3 मॅचमध्ये 8 विकेट घेतलेत. चहलची बायको धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. धनश्री वर्मा इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे. धनश्री वर्माला नुकतच एका पार्टीमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूसोबत पाहण्यात आलं. त्यानंतर सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होतोय. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे जोडपं नेहमी चर्चेत असतं. सोशल मीडियावर दोघेही नेहमी सक्रीय असतात.

युजवेंद्र चहल सोशल मीडियावर नेहमीच गमतीशीर व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याची बायको धनश्री सुद्धा सोशल मीडियावर तितकीच Active आहे. दोघांच्या फोलॉअर्सची संख्या मोठी आहे.

धनश्रीसोबत या फोटोमध्ये अजून कोण आहे?

धनश्री वर्माचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरसोबतचा फोटो समोर आल्यानंतर चर्चेत आहे. धनश्री वर्माने स्वत:च तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेयर केलाय. धनश्री वर्मा एका इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्या फोटोजची सीरीज तिने शेअर केलीय. फोटोजमध्ये श्रेयस अय्यरसोबत त्याची बहिण श्रेष्ठा अय्यर, धनश्री आणि अन्य महिला दिसतायत. हे फोटो व्हायरल होतोच फॅन्स वेगवेगळे कमेंटस करतायत.

‘चहल भाईला न्याय मिळाला पाहिजे’

धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यरच्या फोटोवर फॅन्स सतत Reaction देतायत. ‘चहल भाईला न्याय मिळाला पाहिजे’ असं एका टि्वटर युजरने म्हटलय. ‘हळू-हळू सर्व लक्षात येतय. श्रेयस अय्यरने इंजर्ड होण्याच नाटक का केलं?’ असं दुसऱ्या एका युजरने म्हटलय. काही नेटीजन्सनी श्रेयस आणि धनश्रीच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.

लग्न कधी झालेलं?

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या रिलेशनशिपला सुरुवात झाल्यानंतर त्यांनी तीन महिन्यातच ऑगस्ट 2020 मध्ये साखरपुडा केला. 22 डिसेंबर 2020 रोजी ते विवाहबंधनात अडकले. धनश्री वर्मा डान्स कोरियोग्राफर आणि डेंटिस्ट आहे. धनश्री वर्माचा डान्सशी रिलेटेड एक युट्यूब चॅनल आहे. धनश्री वर्मा बॉलिवूडची गाणी रिक्रिएट करते. धनश्री सोशल मीडियावर भरपूर एक्टिव असते. युजवेंद्र चहलसोबत सुद्धा ती डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तो परदेशात जाणार

श्रेयस अय्यरच्या पाठीवर सर्जरी होणार आहे. त्यामुळे तो आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नाहीय. श्रेयस अय्यरला मैदानात परतण्यासाठी कमीत कमी आणखी तीन महिने लागतील. पाठीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तो परदेशात जाईल. त्यानंतर मैदानावर पुनरागमन करण्यासाठी त्याला तीन महिने लागतील.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.